नंदुरबार : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने ३१ मार्च २०२४ पर्यंत अभय योजना सुरू केली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना सुरू झाली. केवळ एक महिन्यात परिमंडलातील एक हजार ३९१ ग्राहकांनी १.५७ कोटी रुपयांचा भरणा केला. (1 crore paid electricity bill by customers in city )
या योजनेमुळे एक हजार ३९१ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण २५.२६ लाख रुपये माफ झाले. कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असेल.
या योजनेत १ सप्टेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना दहा, तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट मिळेल. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या ३० टक्के भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणीची संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा ३० टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही आहे. (latest marathi news)
योजनेनुसार केवळ एक महिन्यात जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ८२० ग्राहकांनी एक कोटी दोन लाखांचा एकरकमी वीजबिल भरणा केला. धुळे जिल्ह्यातून ३९४ ग्राहकांनी ३५ लाख २४ हजार रुपयांचा, तर नंदुरबार जिल्ह्यातून १७७ ग्राहकांनी १९ लाख ७२ हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे.
जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेत नवीन वीजजोडणीसाठी, ही संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.