नंदुरबार : नाल्यात पोहत असलेल्या म्हशी बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी घडली. यातील मृत ज्ञानेश्वर धात्रक याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता, त्याची लग्नाची तारीखही ठरली होती. घटना घडली, त्या वेळी अवघ्या २०० मीटरवर त्यांचे वडील शेतीकाम करत होते.
मात्र त्यांनाही आपल्या पोटाच्या गोळ्यांचा मृत्यू दिसला नाही. रात्री उशिराने दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच शेतकरी कुटुंबातील तरुण भावंडांचा मृत्यू झाल्याने धात्रक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (2 siblings drown while rescuing buffaloes in Ranale lake)