शहादा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शहादा बसस्थानकाची डिजिटलायझेशन व पुनर्बांधणी करण्यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाच्या गृहविभागाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली. धुळे विभागातील शहादा बसस्थानकाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. स्थानक अद्यावत करण्याची मागणी शहाद्याच्या नागरिकांची होती. (28 Crore funds sanctioned for reconstruction of Shahada bus station )
या मागणीची दखल घेत बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी आमदार राजेश पाडवी यांनी वारंवार राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. अधिवेशनातही हा विषय लावून धरला होता. अखेर शासनाने बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यासह सुमारे २८ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रक मंजूर केले आहे. यात आहे ते बसस्थानक बांधकाम पाडण्यासह नवीन अद्यावत बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार आहे.(latest marathi news)
या आहेत सुविधा
नवीन आगार व्यवस्थापक केबिन, आस्थापना केबिन, टायर रुम, इंधन रुम, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कक्ष, बॅटरी रूम, नवीन २० फलाटांची निर्मिती, वाहनतळावर काँक्रीटीकरण, विद्युत काम, वाहतूक नियंत्रक कक्ष, रिझर्वेशन आणि पासेस रुम, चालक/ वाहक विश्रांतीगृह, पार्सल रुम, हिरकणी कक्ष, प्रवाशांकरीता प्रसाधनगृह, वाणिज्य आस्थापना आदी विकासात्मक कामे केली जाणार आहेत.
''गेल्या अनेक वर्षांपासून शहादा बसस्थानकाचे नूतनीकरण झालेले नाही. परिणामी, नागरिकांसह प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर राज्य शासनाने २८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निविदा प्रक्रिया स्तरावर असून, लवकरच बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासह डिजिटलायजेशन केले जाईल.''- राजेश पाडवी, आमदार, शहादा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.