Lok Adalat : शहादा लोकन्यायालयात 365 प्रकरणांचा निपटारा; अडिच कोटी रुपयांची वसुली

Nandurbar News : शहादा येथील लोक न्यायालयात ३६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडीअंती २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली.
Officials while deciding cases in Shahada Lok Yataka.
Officials while deciding cases in Shahada Lok Yataka.esakal
Updated on

शहादा : येथील लोक न्यायालयात ३६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडीअंती २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहादा तालुका विधी सेवा प्राधिकरण व शहादा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे शनिवारी (ता. २७) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. (Lok Adalat)

यावेळी तालुका विधि सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता म्हणाले, लोकांचा वेळ व पैसा वाचावा म्हणून शासनामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर न्यायालयीन वाद-विवाद खटले आपापसात समजुतीने निकाली निघावे म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात येते. लोकांनी आपले वाद-विवाद.

खटले आपापसात समजुतीने मिटवून आपला वेळ व पैसा वाचवावा, जास्तीत जास्त खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन करण्यात आले. लोक अदालतीमध्ये न्यायालयीन १०७५ प्रकरणे होती. दाखलपूर्व प्रकरणांत बँका व ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांची ४५८० अशी एकूण ५ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी न्यायालयीन-१३७ खटले, तर दाखलपूर्व २२८ खटले असे एकूण ३६५ खटले निकाली काढण्यात आले. त्यातून २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली. यासाठी चार पॅनलची नेमणूक करण्यात आली होती. (latest marathi news)

Officials while deciding cases in Shahada Lok Yataka.
Nandurbar Monsoon Rain : वरुणराजाच्या कृपेने बळीराजा खूश..! समाधानकारक पावसाने पिके तरारली; शेतीकामांना वेग

यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांच्यासोबत ॲड. एम. एस. साळवे, दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यू. एन. पाटील, ॲड. बी. पी. शिंदे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. व्ही. निवघेकर, ॲड. सी. डी. भंडारी.

न्यायमूर्ती श्रीमती एस. आर. पाटील, ॲड. आर. एम. सोनवणे यांचे एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक अधीक्षक एस. व्ही. जवंजलकर, वरिष्ठ लिपिक विलास सूर्यवंशी, किशोर ठाकुर, स्टेनो एम. टी. घुगे यांनी परिश्रम घेतले.

Officials while deciding cases in Shahada Lok Yataka.
Nandurbar News : जुना खेतीया रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिम; शहादा बांधकाम विभागाकडून उपाययोजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.