Nandurbar News : 6 कोटी 28 लाखांची लोकअदालतीत वसुली! विविध विभागांच्या थकबाकीची 1665 प्रकरणे निकाली

Nandurbar News : लोकन्यायालयात नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित व दाखलपूर्व दोन्ही मिळून संपूर्ण जिल्ह्यातून एक हजार ६६५ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणांतून सहा कोटी २८ लाख २४ हजार ५८९ रुपयांची तडजोड करण्यात आली.
Chief District and Sessions Judge while honoring the party who compromised in the Lok Adalat held in the District Court. Ashutosh Karmarkar,
Chief District and Sessions Judge while honoring the party who compromised in the Lok Adalat held in the District Court. Ashutosh Karmarkar, esakal
Updated on

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका, श्रीराम फायन्सास, इक्विट्स फायनान्स व बीएसएनएल यांची थकबाकीची एक हजार ६६५ प्रकरणे शनिवारी (ता. २७) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात सहा कोटी २८ लाख २४ हजार ५८९ रुपये वसूल करण्यात आले. (Nandurbar 6 Crore 28 Lakhs recovered in Lok Adalat)

जिल्हा न्यायालयातील लोकअदालतीत प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आशुतोष करमरकर, जिल्हा न्यायाधीश-१ आर. जी. मलशेट्टी, जिल्हा न्यायाधीश-२ एम. आर. नातू, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. एस. टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी अजित ए. यादव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव महेंद्र ब. पाटील, वरिष्ठ स्तर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश आर. एन. गायकवाड, कनिष्ठ स्तर २ रे सह दिवाणी न्या. ए. आर. कुलकर्णी, तसेच पॅनल विधिज्ञ उपस्थित होते.

लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रभारी प्रबंधक डी. पी. सैंदाणे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रेमानंद इंद्रजित, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक जे. वाय. सानफ तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी सहकार्य केले. (latest marathi news)

Chief District and Sessions Judge while honoring the party who compromised in the Lok Adalat held in the District Court. Ashutosh Karmarkar,
Pankaja Munde News: मराठा, ओबीसी आरक्षणाच्या वादावर पंकजा मुंडे काय बोलल्या?

या लोकन्यायालयात नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित व दाखलपूर्व दोन्ही मिळून संपूर्ण जिल्ह्यातून एक हजार ६६५ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणांतून सहा कोटी २८ लाख २४ हजार ५८९ रुपयांची तडजोड करण्यात आली.

Chief District and Sessions Judge while honoring the party who compromised in the Lok Adalat held in the District Court. Ashutosh Karmarkar,
Nandurbar News : होमगार्ड रिक्त पदभरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी; अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()