Nandurbar Accident News : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू; नंदुरबार येथील करण चौफुलीजवळील घटना

Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Vishal Chaudhary
Vishal Chaudharyesakal
Updated on

नंदुरबार : येथील करण चौफुलीजवळ मंगळवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला. मृताचे नाव विशाल हिरालाल चौधरी (वय ३१) असे आहे. (Nandurbar Accident Bike rider dies after being hit by speeding truck Karan Chauphuli marathi news)

घटनेची माहिती अशी, की शहरातील शहादा बायपासला लागून असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील रहिवासी असलेला विशाल चौधरी दुपारी दोनच्या सुमारास करण चौफुलीकडे दुचाकीने जात होता. त्या वेळी समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यास धडक दिली.

त्यामुळे विशाल रस्त्यावर पडला. त्याचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारी दोनच्या सुमारास त्या परिसरात शुकशुकाट होता. काही वेळाने तेथून जाणाऱ्या काही जणांना अपघात झाल्याचे लक्षात आले.

त्यात कोणीतरी युवकाला ओळखले. त्यांनी पोलिस व अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिस, युवकाचे मित्र व कुटुंबीयांची घटनास्थळी गर्दी झाली होती. संबंधित युवक फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करत होता.  (latest marathi news)

Vishal Chaudhary
Nasrapur Fire Accident : शिवापूर-रांझे येथील दोन कंपन्यांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

चौफुल्या बनल्या जीवघेण्या

करण चौफुली, धुळे चौफुली, जगतापवाडी चौफुली, अंधार स्टॉप परिसरातील कॉलेज कॉर्नर चौफुली, मोठा मारुती चौफुली या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेली ठिकाणे आहेत. या ठिकाणी नेहमी अपघात घडतात. येथे संबंधितांनी लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

या चौफुली जीवघेण्या बनल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवजड वाहनधारक या ठिकाणाहून भरधाव वाहने घेऊन जातात. त्यामुळे दुचाकीस्वार वा पादचारी यांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात धुळे चौफुलीवर शालेय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. आजची ही दुसरी घटना आहे.

Vishal Chaudhary
Nagpur Accident: मद्यधुंद कारचालकाने बहीण-भावाला उडविले; पाचपावली पुलावर थरार, उड्डाणपुलाखाली दोघेही फेकल्या गेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.