Nandurbar News : कोंडाईबारी घाटात ट्र्कने 58 मेंढ्यांना चिरडले; रस्त्यावर पडला मृत मेढ्यांचा खच

Nandurbar News : कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याने चाललेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला.
A truck rammed into a herd of sheep passing by and a citizen helping.
A truck rammed into a herd of sheep passing by and a citizen helping.esakal
Updated on

नवापूर : धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या (एपी ३१, पीजी ०८६९) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याने चाललेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. या ट्रकने चिरडल्याने ५८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. ४२ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रस्त्यावर मृत मेंढ्यांचा खच पाहून मेंढपाळांनी आक्रोश केला. (Truck crushed 58 sheep in Kondaibari Ghat )

मेंढीचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळू सोमा गोईकर, दगडू गोईकर (रा. विजापूर, ता. साक्री, जि. धुळे) हे ७०० मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरातमध्ये जात होते. मागून येणारा ट्रकचालक रमेश दुगंला राजू याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो सरळ मेंढ्यांच्या कळपात घुसला व मेंढ्यांना चिरडत गेला. या कळपात काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (latest marathi news)

A truck rammed into a herd of sheep passing by and a citizen helping.
Nandurbar News : आष्टे आफ्रिकन स्वाइन फिवर बाधित घोषित! मृत वराहांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी शेट्टींचे उपायोजना करण्याचे आदेश

हा अपघात एवढा भीषण होता, की घटनास्थळी मेंढ्यांच्या रक्तमांसाचा अक्षरशः सडा पडलेला होता. संपूर्ण रस्त्यात मेंढ्या मृतावस्थेत पडल्या होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करीत मेंढपाळाने ट्रकचालकावर कठोर कारवाई करीत नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

विसरवाडीचे उपनिरीक्षक किरण पाटील, अंमलदार व महामार्ग पोलिस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण कोकणी तपास करीत आहेत.

A truck rammed into a herd of sheep passing by and a citizen helping.
Nandurbar Crime News : दरोड्यातील 6 आरोपींना कारावास! दहा हजारांचा दंड; अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचा निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.