Nandurbar News : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील 27 व्यावसायिकांवर कारवाई

Nandurbar News : शहरातील नाट्यमंदिर परिसर, स्टेट बँक परिसर, मंगळ बाजार, घी बाजार, पालिका चौक, शास्त्री मार्केट, सुभाष चौक, अमृत चौक परिसरात व्यापारी गाळे असलेले दुकानदार रस्त्यावर आपले सामान ठेवून अतिक्रमण करीत आहेत
Shop Encroachment
Shop Encroachmentesakal
Updated on

Nandurbar News : शहरातील वाहतूक व अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जनतेकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार ‘सकाळ’ने पाच दिवस वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत वाहतूक शाखेकडून शहरातील रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या २७ व्यावसायिकांविरुद्ध कारवाई केली आहे. (Nandurbar Action taken against 27 businessmen)

Shop Encroachment
Dhule News : धुळे शहरात दीडशे इमारती धोकादायक! महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा; काही इमारतींत नागरिकांचे वास्तव्य

शहरातील नाट्यमंदिर परिसर, स्टेट बँक परिसर, मंगळ बाजार, घी बाजार, पालिका चौक, शास्त्री मार्केट, सुभाष चौक, अमृत चौक परिसरात व्यापारी गाळे असलेले दुकानदार रस्त्यावर आपले सामान ठेवून अतिक्रमण करीत आहेत. तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे रस्त्यातच आपली दुकाने थाटतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. याबाबत जनमानसातून नाराजीचे सूर व्यक्त केले जात होते.

त्या भावना ‘सकाळ’ने सलग पाच दिवस वृत्तमालिकेच्या माध्यमातून मांडल्या होत्या. त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी घेऊन वाहतूक शाखेला त्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेने वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक तानाजी बहिरम, संजय डांगे व वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी २७ जणांवर कारवाई केली. (latest marathi news)

Shop Encroachment
Dhule Drought News: पाण्याअभावी व्हाइटसह ग्रीन नेटशेड ड्राय! दुष्काळाची झळ; शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्चा वाया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.