School First Day : जिल्ह्यातील शाळांची आज घंटा वाजणार; स्वागतासाठी शाळा सज्ज

School First Day : शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील ४०२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
Staff cleaning classrooms on the occasion of school entrance festival.
Staff cleaning classrooms on the occasion of school entrance festival. In the second photo, Sharad Patil, librarian of Vikas Vidyalaya, is setting up a set to give free textbooks to the students on the first day.esakal
Updated on

School First Day : कुठे साफसफाई... कुठे डागडुजी... तर काही ठिकाणी रंगरंगोटी, तर काही कर्मचारी पुस्तकांचा संच लावण्यात व्यस्त अशा अनेकविध कामात शिक्षण विभागातील सारेच कर्मचारी दंग. निमित्त होते विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव चैतन्यमय करण्याचा... नव्या शैक्षणिक वर्षाच्या शाळा प्रवेशोत्सवासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग सारेच आतुर झाले असून, शनिवारी (ता. १५) नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग तयारीत गुंतला आहे. (Admission program of students will be conducted in 402 schools )

शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील ४०२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण तालुक्याभरात मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

त्यासाठी स्थानिक स्तरावर वर्गसजावट, तोरण बांधणे, साफसफाई, आकर्षक रांगोळ्या, दिंडी आयोजन, शिक्षण पालखी मिरवणूक, दाखल पात्र मुली-मुलांना वाजतगाजत मिरवणुकीने स्वागत, खाऊवाटप असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत केले जाणार आहे.

वर्षभर उपस्थितीसाठी प्रयत्न

शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटीचे नियोजनही करण्यात आले आहे. वर्षभर विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळांचेही रुपडे पूर्णपणे बदलून गेले आहे.

डिजिटल क्लासरूम, कृतियुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्यशिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, संगणक, शिक्षण या सुविधांच्या लाभ दिला जात आहे. (latest marathi news)

Staff cleaning classrooms on the occasion of school entrance festival.
School First Day : धम्माल ‘मस्ती की पाठशाला’नंतर आजपासून ‘स्कूल चले हम’; भुसावळ तालुक्यात प्रवेशोत्सवाची उत्सुकता

तालुक्यात ५७ हजार ८९९ लाभार्थी

जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या ५७ हजार ८९९ लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन लाख २६ हजार ५०९ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यात एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत.

११३ शिक्षकांची पदे रिक्त

शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २३४ शाळा असून, प्राथमिक शिक्षकांची ८३४ मंजूर पदे आहेत. पैकी ७२१ भरलेली असून, ११३ पदे रिक्त आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, रिक्त पदे मात्र कायम आहेत.

''तालुक्यातील प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्चमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना दाखल केले जाणार आहे. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहारातून मिष्ठान्न तसेच नावीन्यपूर्ण विविध उपक्रम, प्रभातफेरी काढून चैतन्यमय वातावरणात प्रवेशोत्सव कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.''-डॉ. योगेश साळवे, गटशिक्षणाधिकारी, शहादा

Staff cleaning classrooms on the occasion of school entrance festival.
School First Day : नवीन शैक्षणिक वर्षाची उत्सुकता शिगेला; नवागतांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम

शाळेच्या पहिल्या दिवशी

-विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणार.-विद्यार्थी व शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्‍बोधन कार्यक्रम.

-विद्यार्थ्यांचे स्वागत वाजतगाजत तसेच गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन होणार.

-प्रभातफेरीचे आयोजन, विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण आदींसह विविध कार्यक्रम.-प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन.

व्यवस्थापननिहाय पटसंख्या २०२३-२४

व्यपस्थापन प्रकार : एकूण शाळा मुले मुली एकूण

जिल्हा परिषद : २३४ १२,१७३ १२,१२७ २४,३००

खासगी अंशतः अनुदानित : २५ ३,३५७ ३,३४० ६,६९७

खासगी अनुदानित : ६५ २२,३१९ १९,८३७ ४२,१५६

स्वयंअर्थसहाय्य : २३ ३,४७४ २,३५८ ५,८३२

खासगी विनाअनुदानित : १६ १,६०८ १,२२२ २,८३०

पालिका : १४ १,०१४ ९९२ २,००६

आदिवासी कल्याण खासगी विनाअनुदानित : १० १,४०८ ९७५ २,३८३

आदिवासी कल्याण विभाग : ११ २,०७८ १,८९६ ३,९७४

सामाजिक कल्याण खासगी विनाअनुदानित : २ ४५ ३० ७५

समाजकल्याण विभाग : १ १२८ ०० १२८

सामाजिक कल्याण खासगी अनुदानित : १ १२५ १०७ २३२

एकूण : ४०२ ४७,७२९ ४२,८८४ ९०,६१३

Staff cleaning classrooms on the occasion of school entrance festival.
School First Day : भडगावात पहिल्याच दिवशी होणार स्वागत; 97 टक्के पुस्तके प्राप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com