Nandurbar Agriculture News : बोरद येथे शेतकऱ्याकडून खरबुजाचे विक्रमी उत्पादन

Nandurbar Agriculture : राहुल बन्सी पाटील यांनी आपल्या मामाच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आता खरबुजाची लागवड करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे.
A bumper crop of melons grown by Rahul Patil in Shivar
A bumper crop of melons grown by Rahul Patil in Shivaresakal
Updated on

Nandurbar Agriculture News : येथील राहुल बन्सी पाटील यांनी आपल्या मामाच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आता खरबुजाची लागवड करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यातून त्यांना चांगले आर्थिक लाभ होऊ लागला आहे. श्री. पाटील यांनी या वर्षी जानेवारीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मोड ते बोरद रस्त्यालगत असलेल्या क्षेत्रातील सात एकर क्षेत्रात खरबुजाची यशस्वी लागवड केली. (Nandurbar Agriculture Record production of melon by farmers in Borad)

त्यासाठी त्यांनी लायलपूर (बीएएसएफ) कंपनीची टिश्यू रोपे आणली. आधी क्षेत्राची योग्य पद्धतीने मशागत केल्यानंतर वाफ्यांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर केला. पाण्याच्या व लिक्विड खताच्या योग्य नियोजनासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. त्यामुळे या रोपांना वेळोवेळी पाण्याचा व लिक्विड खताचा योग्य पुरवठा करता आला.

त्याचा परिणाम म्हणजे अवघ्या अडीच महिन्यांत या पिकाचे यशस्वी उत्पादन मिळण्यास सुरू झाले आहे. आज हे पीक बहरले आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने खरबुजाला मागणी वाढली आहे. त्यामुळे अपेक्षित भाव मिळत आहे.

एका किलोला २१ रुपयांचा भाव मिळत असल्याने त्यांना या पिकाचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत त्यांनी या क्षेत्रातून १०५ टन उत्पन्न मिळविले असून, अजूनही त्यांना २५ ते ३० टन उत्पन्न अपेक्षित आहे. (latest marathi news)

A bumper crop of melons grown by Rahul Patil in Shivar
Nashik Agriculture News: नांदगावची केळी सौदी अरेबियात खाणार भाव! बोराळेच्या राजपूत कुटुंबियांचा प्रयोग यशस्वी; लाखोंची उलाढाल

खरबुजाची लागवड आणि सुयोग्य ठिबक सिंचन तसेच नियोजनासाठी त्यांनी या सात एकर क्षेत्रावर सात ते आठ लाख रुपये खर्च केला आहे. आतापर्यंत त्यांना १२ ते १४ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले असून, एकूण २० लाखांचे उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे.

"मी शेतामध्ये अनेक प्रयोग राबविले, परंतु काही धान्यांमध्ये तसेच इतर पिकांमध्ये शासनातर्फे जो हमीभाव दिला जातो त्यापेक्षा कमी भावात व्यापारी शेतकऱ्याचा माल खरेदी करत असतात. ते शेतकऱ्यांना परवड नाही. आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करावेत आणि कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, कमी कालावधीच्या पिकांमध्ये जोखीम मोठ्या प्रमाणावर असते. जोखीम घेतल्याशिवाय मार्ग सापडत नाही."-राहुल पाटील, बोरद (ता. तळोदा)

A bumper crop of melons grown by Rahul Patil in Shivar
Nashik Agricultural Success: परदेशवाडीतील पती-पत्नीने फुलवली नैसर्गिक मिश्रशेती! झाडे दांपत्यांचा यशस्वी प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.