Nandurbar Agriculture News: स्ट्रॉबेरी, सफरचंदापाठोपाठ सातपुड्यात ड्रॅगन फ्रुटची शेती; कोरडवाहू जमिनीत यशस्वी प्रयोग

Nandurbar Agriculture : सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमिनीसोबतच पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही.
Dilip Padavi, a young tribal farmer from Dab Walamba, successfully grows an exotic dragon fruit crop in a dryland area.
Dilip Padavi, a young tribal farmer from Dab Walamba, successfully grows an exotic dragon fruit crop in a dryland area.esakal
Updated on

सागर निकवाडे : सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमिनीसोबतच पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही. परिणामी, येथील आदिवासी बांधवांना रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावे लागते. त्यामुळे केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी इतर पर्याय शोधत असून, आता शेतकरी आधुनिकतेकडे वळताना दिसत आहे. सातपुड्यातील दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्याने कोरडवाहू क्षेत्रावर विदेशी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ( Strawberry Apple and Dragon Fruit Cultivation Successful Experiment)

‘केल्याने होत आहे रे..आधी केलीची पाहिजे...’ या वाक्याला साजेल असेच कार्य अक्कलकुवा तालुक्यातील डाब वालंबा या गावातील दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्याने करून दाखवले आहे. काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत असले तरी शेतीमध्ये काय राम आहे, असे म्हणणारे पावलोपावली भेटतातच. पण, युवा शेतकरी दिलीप पाडवी याला अपवाद आहे. ज्या अक्कलकुवा तालुक्यात फक्त पावसाळी पिके घेतली जात होती त्या भागात आता शेतकरी बारामाही ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेणार आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून दिलीप पाडवी याला ६० रुपये दराने ड्रॅगन फ्रुटची रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. आपल्या छोट्याशा जमिनीत ५०० रोपांची लागवड केली असून, मागील जून महिन्यात त्यांनी ही रोपे लावली आहेत. आता वर्षभरानंतर त्या झाडांना फळ लागले आहे. योग्य नियोजन, सोबतच ठिंबक सिंचनचा वापर करत आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत आणि कीटकनाशक न वापरता त्यांनीही ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे.

योग्य दर्जाचे आणि आरोग्यास उपयुक्त अशा ड्रॅगन फ्रुटची शेती त्यांनी केली आहे. या ड्रॅगन फ्रुटला सध्या बाजारात दोनशे रुपये प्रति किलोने भाव मिळत आहे. यातून शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर आता प्रगतिशील शेतकरीही याच पिकाचे अनुकरण करु लागले आहेत. (latest marathi news)

Dilip Padavi, a young tribal farmer from Dab Walamba, successfully grows an exotic dragon fruit crop in a dryland area.
Nandurbar Agriculture News: पपईच्या बागेवर फिरवले रोटाव्हेटर; पिकाला भाव नसल्याचे उचलले पाऊल

''डाब वालंबा येथील तरुण शेतकरी दिलीप पाडवी त्यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट या फळ पिकाची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाचा मार्गदर्शनाने एकाच पिकावर अवलंबून न राहता आधुनिक पद्धतीने येथील शेतकरी शेती करत असून, या भागात अगोदर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करण्यात आली होती. यानंतर आता कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची देखील यशस्वी शेती केली जात आहे.''- कायत मदनलाल, कृषी सहाय्यक

''माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मला शेतीत आवड असल्याने काहीतरी नवीन पद्धतीने शेती करावी, अशी नेहमीच कल्पना असायची. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने मी अगोदर स्ट्रॉबेरी फळाची लागवड केली. त्यातून मला लाखोंचे उत्पन्न मिळाले. त्या पाठोपाठ आता मी ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचे ठरवले आणि त्याचा यशस्वी प्रयोग देखील केला आहे.''- दिलीप पाडवी, ड्रॅगन फ्रुट उत्पादक

''सातपुड्यातील आदिवासी शेतकरी आता आपल्या शेतीत नवनवीन आणि आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. यातच या भागात स्ट्रॉबेरीचे यशस्वी प्रयोग झाल्यानंतर आता या युवा शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. विशेष म्हणजे हे शेती करताना कमीत कमी पाण्याचा वापर करत त्याने ही शेती यशस्वी केली आहे. यातच त्यांना कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांची किंवा औषध फवारणीचा वापर न केल्यामुळे आरोग्यासाठी दर्जादायक असा त्याने ड्रॅगन फ्रुट तयार केला आहे.''- आरती देशमुख, विशेषतज्ज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

Dilip Padavi, a young tribal farmer from Dab Walamba, successfully grows an exotic dragon fruit crop in a dryland area.
Nandurbar Agriculture News : तळोद्यात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल; पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.