Nandurbar News: घरकुल हवंय..! तर ग्रामपंचायतीकडे करा अर्ज; निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची ग्रामसभेत होणार निवड

Nandurbar News : ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो.
gharkul
gharkulesakal
Updated on

नवापूर : ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्याची ग्रामसभा निवड करणार आहे. (Nandurbar apply to Gram Panchayat for gharkul)

योजनेचे निकष

लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी तथा इतर मागास प्रवर्गातील असायला हवा. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारांपेक्षा अधिक नसावे. त्याच्या मालकीचे पक्के घर नसावे. हे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यास मोदी आवास योजनेंतर्गत घरकुल दिले जाते.

लाभार्थ्यांनी अर्ज करावेत

मोदी आवास योजनेंतर्गत पात्र असलेले मात्र गतवर्षी लाभ न मिळालेले लाभार्थी, तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभा निश्चित करेल. घरकुलांसाठी संबंधित पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवही उतारा किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, मनरेगा जॉबकार्ड, लाभार्थ्याच्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत आदी कागदपत्रे. या योजनेंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे विहित मुदतीत अर्ज करावा.

नवापूर तालुक्यात घरकुलांना अर्ज करण्याची गरज नाही. ‘ड’ यादीप्रमाणे मंजूर होतात. नवापूर तालुक्यात चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा या गावांतच अल्प प्रमाणात लाभार्थी असल्याने ३३ घरांना प्राधान्य आहे. आवास प्लसमधील प्रतीक्षायादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले. तसेच ऑटोमॅटिक सिस्टिमद्वारे रद्द झालेल्या पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य दिले गेले. (latest marathi news)

gharkul
Nashik Monsoon Update : मंगळवारी शून्‍य मिलिमीटर पावसाची नोंद! पावसाची दडी, आद्रतेने उकाडा

काय आहे मोदी आवास योजना?

नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी शासनाने मोदी आवास योजना इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी अमलात आणली आहे. याअंतर्गत एक लाख २० हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थ्यास किमान २६९ चौरसफूट इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

"नवापूर तालुक्याचे या वर्षीचे उद्दिष्ट लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पूर्ण झाले आहे. या योजनेतील प्रस्ताव पुढच्या वर्षी स्वीकारले जातील. लाभार्थ्यांचा मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच खात्यात जमा झाला आहे. २०२३-२४ चे ३३ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. तसेच लाभार्थ्यांनी मागील २०२०-२१ ते २०२३-२४ या वर्षातील मंजूर घरकुल अपूर्ण आहे ते तत्काळ पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे." - देवीदास देवरे, गटविकास अधिकारी, नवापूर

gharkul
Dhule Agriculture News : तृणधान्यात मका पेरणी सर्वाधिक! साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचा हमखास उत्पन्नामुळे कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.