Nandurbar News : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार ‘स्मार्ट एज्युकेशन’

Nandurbar : शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची विविध विषयातील संकल्पना आत्मसात करण्याची क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Project Officer Chandrakant Pawar and other dignitaries after signing the agreement.
Project Officer Chandrakant Pawar and other dignitaries after signing the agreement.esakal
Updated on

Nandurbar News : आधुनिक युगात तंत्रज्ञान हे शिक्षणाचा अविभाज्य घटक बनत आहे. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची विविध विषयातील संकल्पना आत्मसात करण्याची क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार आणि टेक्नोशाला, बंगळुरु यांच्यामध्ये शासकीय आश्रमशाळांमध्ये तंत्रज्ञान-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. 9Nandurbar Ashram school students will get smart education)

भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या पार्श्वभूमीवर, टेक्नोशालाच्या मदतीने दोन शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्वसमावेशी डिजिटल स्मार्ट क्लासरूम स्थापन करण्यात येणार आहेत. यात अत्याधुनिक इंटरएक्टिव्ह डिजिटल बोर्ड आणि अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी पॉवर बॅकअपची सुविधा पुरवण्यात येणार आहे.

स्मार्ट क्लासरूमच्या मदतीने विद्यार्थी डिजिटल कॉन्टेंट, व्हिडिओज, इमेजेस, ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनद्वारे शिक्षण घेऊ शकतील. पहिली ते दहावीपर्यंतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा अभ्यासक्रम आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन डिजिटल संसाधने उपलब्ध करून दिली जातील.

स्मार्ट क्लासरूमद्वारे परस्पर संवादी तंत्रे, मल्टीमीडिया सामग्री कशी वापरायची, तंत्रज्ञानाचा वापर करून शाळांमध्ये शिक्षण आनंददायी बनवणे, विविध तंत्रज्ञान आणि डिजिटल संसाधने वापरून मुलांना उत्तम दर्जाचे आणि आधुनिक शिक्षण देणे यासंदर्भात शिक्षक आणि मुख्याध्यापकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या करारानुसार, नंदुरबार प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल उपकरणे जसे की स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर आणि कॉम्प्युटर यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सर्वेक्षण करून योजना बनवली जाणार आहे आणि शिक्षकांना शैक्षणिक प्रक्रियेमध्ये या उपकरणांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल.(latest marathi news)

Project Officer Chandrakant Pawar and other dignitaries after signing the agreement.
Nandurbar News : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया

जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोचक आणि मनोरंजक बनवण्यासाठी उपयोग होईल. करारावर चंद्रकांत पवार, निर्मल माळी, रवींद्र भोये आणि टेक्नोशालाचे सीईओ रामेश्वर वाळकीकर यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

"टेक्नोशाला सोबत केलेल्या करारामुळे आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. डिजिटल स्मार्ट क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना शिकणे अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्यास मदत करतील." -चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी

"स्मार्ट क्लासरूम विद्यार्थ्यांना शिकण्याचा एक नवीन आणि रोमांचक अनुभव प्रदान करतील. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होईल. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देण्यासाठी टेक्नोशाला प्रयत्नशील आहे."- संजीथ शेट्टी, संस्थापक टेक्नोशाला

Project Officer Chandrakant Pawar and other dignitaries after signing the agreement.
Nandurbar News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग कामाला गती; चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.