गेली तीस वर्षे डॉ. विजयकुमार गावित यांचा मतदारसंघावर प्रभाव. अपक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आता भाजप असा राजकिय प्रवास करीत मतदारसंघात आपली पकड त्यांनी मजबूत केली आहे. विकास कामे समाधानकारक झाले आहेत. जिल्हा मुख्यालयाचा मतदार संघ व त्यातच या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे डॉ. विजयकुमार गावित मंत्री असल्याने या शासकिय योजनांसह मुलभूत विकासाला चालना मिळाली आहे. असे असले तरी महाविकास आघाडीकडून यावेळेस कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र डॉ. गावितांसमोर सक्षम उमेदवार विरोधकांकडे आतापर्यंत गवसला नाही. (Nandurbar Assembly Strategizing for tough challenge)