Nandurbar Bull Market : तळोद्यातील बैल बाजारात ‘बुल रन’! 700 बैलांची आवक; पहिल्या दिवशी 70 लाखांची उलाढाल

Nandurbar News : गुजरात, मध्य प्रदेश या राज्याबरोबरच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणले आहेत
Bull market held in Taloda Bazar Committee.
Bull market held in Taloda Bazar Committee.esakal
Updated on

तळोदा : बैल बाजारासाठी संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध असलेल्या कालिका मातेचा यात्रोत्सवात बाजार समितीत ७०० बैलांची आवक आली आहे. त्यातील पहिल्याच दिवशी तब्बल ४०० बैलांची विक्री झाली असून, ७० लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही उलाढाल अजून वाढण्याची शक्यता आहे. (Nandurbar boom in bull market in Taloda)

ग्रामदेवता कालिका मातेच्या यात्रोत्सव अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुरू झाला आहे. यात्रेत सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत, तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने पेठा ग्राउंडवर बैल बाजार भरविला आहे. गुजरात, मध्य प्रदेश या राज्याबरोबरच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणले आहेत. सुमारे ७०० बैलांची आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील ४०० बैलांची विक्री पहिल्याच दिवशी होऊन त्यातून ७० लाखांची उलाढाल झाल्याचीही माहिती देण्यात आली. (latest marathi news)

Bull market held in Taloda Bazar Committee.
Dhule Drought News : दुष्काळात चातकासारखी प्रतीक्षा पावसाचीच! वेधशाळेनेच्या संकेताने बळीराजा आंतरमशागतीत व्यस्त

सर्वाधिक ५५ हजार रुपयांना बैलजोडी विक्रीस गेली आहे. या वर्षी बैलजोडीपेक्षा सिंगल बैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. अजूनही बैलांची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीने व्यावसायिक व बैलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय पशुवैद्यकीय पथकदेखील तैनात करण्यात आले आहे.

Bull market held in Taloda Bazar Committee.
Nandurbar Lok Sabha Election: मतदान पथकाच्या गृहभेटीत ‘त्यांनी’ बजावला हक्क! नवापूर येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाचे मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.