Nandurbar News : जुना खेतीया रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिम; शहादा बांधकाम विभागाकडून उपाययोजना

Nandurbar News : शहरातील अत्यंत महत्वपूर्ण व सातत्याने रहदारी असलेल्या जुना खेतीया रस्त्याची मलोनीपर्यंत दुर्दशा झालेली होती.
Laborers filling potholes on Khetiya road in Shahada town.
Laborers filling potholes on Khetiya road in Shahada town.esakal
Updated on

शहादा : शहरातील अत्यंत महत्वपूर्ण व सातत्याने रहदारी असलेल्या जुना खेतीया रस्त्याची मलोनीपर्यंत दुर्दशा झालेली होती. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली होती. अखेर शनिवारपासून शहादा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

डामरखेडाजवळील गोमाई नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर वाहतूक प्रकाशा-काथर्दे-भादे- पिंगाने-शहादामार्गे वळविण्यात आलेली आहे. सर्व अवजड वाहने शहादा शहरातील खेतिया रस्त्याने जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले होते.

दररोज अपघाताचे प्रमाण वाढले होते. शाळकरी विद्यार्थी रस्त्यावरील खड्ड्यात पडत होते. शहरातील नागरिक व वाहनधारकांचा रोष कमालीचा वाढत होता. सदर रस्ता पाडळदा चौफुलीपासून लोणखेडा बायपासपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. (latest marathi news)

Laborers filling potholes on Khetiya road in Shahada town.
Nandurbar News : शिवणकाम व्यवसायाची उसवली वीण; बोरद येथे काम नसल्याने व्यावसायिकांचे स्थलांतर

गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीबाबत विविध सामाजिक संघटनांनी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केलेली होती. परंतु, दखल घेतली जात नव्हती. शेवटी नागरिक व वाहनधारकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.

शुक्रवारी (ता. २६) खड्ड्यांमध्ये गॅस सिलिंडर वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याने अपघात झाला होता. सुदैवाने स्फोट झाला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हा सर्व प्रकार बघता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.

Laborers filling potholes on Khetiya road in Shahada town.
Nandurbar Crime : पर्यटकांच्या वाहनाची काच फोडून मुद्देमाल लंपास; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; वाल्हेरी धबधब्यावरील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.