Nandurbar Water Shortage: लघुप्रकल्पांनी तळ गाठल्याने वाढल्या चिंता; तळोदा तालुक्यात सगळ्यांच्या नजरा आता पावसाकडे

Water Shortage : तळ गाठल्याने आता चिंता वाढल्या असून, त्याचा परिणाम परिसरातील विहिरी, कूपनलिका यांना जाणवू लागला आहे.
Base reached by Micro Irrigation Project.
Base reached by Micro Irrigation Project.esakal
Updated on

Nandurbar Water Shortage : तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढावली, धनपूर लघुप्रकल्पांनी अक्षरशः तळ गाठल्याने आता चिंता वाढल्या असून, त्याचा परिणाम परिसरातील विहिरी, कूपनलिका यांना जाणवू लागला आहे. लघुप्रकल्पांची पाणीपातळी कमालीची खालावत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून, आता त्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. ( Concerns increased in farmer as small scale projects bottomed out )

तळोदा तालुक्यात रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढावली व धनपूर हे लघुसिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांमुळे तालुक्‍यातील जवळपास एक हजार २०० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा नेहमीच या प्रकल्पांच्या पाणीसाठ्याकडे लागून असतात. सातपुडा पायथ्याशी तळोदा-धडगाव रस्त्यावर स्थित असणारा रोझवा लघुसिंचन प्रकल्प हा परिसरातील रोझवा, रोझवा पुनर्वसन, रांझणी, प्रतापपूर, चिनोदा पट्ट्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेला आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पात दर वर्षी होणाऱ्या जलसाठ्यावरच अवलंबून असते. याशिवाय परिसरातील भूमिगत जलस्रोतांची पाणीपातळीदेखील या प्रकल्पात वर्षभर जलसाठ्यावरच निर्धारित असते. आता या लघुप्रकल्पाने तळ गाठल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावण्यास सुरवात झाली असून, परिसरातील शेतातील ऊस, केळी, पपईसारखी मोठी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे.

Base reached by Micro Irrigation Project.
Nashik Water Shortage : नवीन जलकुंभाच्या निर्मितीनंतरही पाणीटंचाई कायम; पंचवटीत अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी वणवण

तीच गत इतर लघुप्रकल्पांची असून, त्या परिसरातील पाणीपातळीतही घट होऊ लागल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १.६३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पाच्या गेट व पाटचारी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे जलसाठा आतापर्यंत टिकून राहण्यास मदत झाली होती. परंतु पुरेशी खोली रुंदी नसल्याने रोझवा लघुप्रकल्पांसह इतर लघुप्रकल्पांना पाणी साठवणीत अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बंधारे, लघुसिंचन प्रकल्प, शेततळे निर्माण करण्यासह खर्च करीत असताना या लघुप्रकल्पांची खोली-रुंदी वाढविण्यासाठी भर देण्यात यावा आणि यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या या लघुसिंचन प्रकल्प परिसरात पाण्याची टंचाई भासू लागली असून, आता शेतकऱ्यांसोबत पशुपालकांचीही चिंता वाढू लागली आहे.

गाळ काढणे आवश्यक तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढावली व धनपूर या पाचही लघुसिंचन प्रकल्पांत पाणीसाठा नाहीच्या बरोबर असून, यात सुपीक गाळ बऱ्यापैकी साचला आहे. त्यामुळे हा गाळ काढणे आवश्यक असून, तो काढला गेल्यास लघुसिंचन प्रकल्पात खोलीकरणाला मदत होणार आहे. यातून स्थानिकांनाही रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Base reached by Micro Irrigation Project.
Water Shortage Vasai : वसईच्या पूर्व पट्टीत भीषण पाणी टंचाई; ७० हजार नागरिकांना होतोय पाच टँकरनी पाणी पुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.