State Bank of India
State Bank of Indiaesakal

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा ग्राहक आयोगाचा स्टेट बँक नंदुरबार शाखेला दणका

Nandurbar News : नियमित खातेदार ग्राहकास योग्य सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरलेल्या स्टेट बँकेला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे.
Published on

Nandurbar News : नियमित खातेदार ग्राहकास योग्य सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरलेल्या स्टेट बँकेला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. नंदुरबार येथील रहिवासी प्रचेती देसाई यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, नंदुरबार येथे आपले पीपीएफचे खाते उघडले होते. खात्यावर दर वर्षी एकरकमी दीड लाख रुपये जमा करीत होते. (Nandurbar Consumer Commission has slammed State Bank of india)

मे २०२० मध्ये त्यांनी जळगाव जनता सहकारी बँकेचा धनादेश एक लाख ५० हजार रुपये पीपीएफ खात्यात जमा करण्यासाठी दिला. त्या वेळी मार्च २०२० पासून कोविड आणि लॉकडाउनमुळे बँकेचे कामकाज ठराविक तास सुरू होते. यामुळे त्या कालावधीत बँकेचे पासबुक प्रिंट करून दिले जात नव्हते.

तक्रारदार मे २०२१ मध्ये बँकेत पासबुक नोंदी करण्याकरिता गेले असता पीपीएफ खाते नूतनीकरण केले नसल्यामुळे धनादेश जमा केलेला नाही. त्यानंतर बँकेने चेकची रक्कम मे २०२१ मध्ये साधारण वर्षभराने जमा केल्यामुळे प्रचेती देसाई यांनी ग्राहक आयोग, नंदुरबार यांच्याकडे ॲड. नीलेश देसाई यांच्यामार्फत बँकेविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. (latest marathi news)

State Bank of India
Nandurbar News : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील 27 व्यावसायिकांवर कारवाई

दाखल तक्रार, शपथपत्र, इतर कागदपत्र आणि वकिलांचा युक्तिवाद या सर्वांचे सखोल अवलोकन करून अध्यक्ष डी. एम. प्रसन्ना, सदस्य एम. एस. बोडस, तसेच सदस्या एम. एस. पवार यांनी तक्रार मंजूर करून बँकेने तक्रारदारांच्या पीपीएफ खात्यात रक्कम रुपये एक लाख ५० हजार यावर दर साल दर शेकडा ८ टक्के दराने होणारी रक्कम जमा करावी.

शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार रुपये आदेश तारखेपासून ४५ दिवसांच्या आत भरावा, असे आदेश नंदुरबार जिल्हा ग्राहक आयोगाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, नंदुरबार यांना दिला आहे. ग्राहक आयोगाच्या या दणक्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

State Bank of India
Nandurbar Constituency Lok Sabha Election Result: महाराष्ट्रात काँग्रेसने खातं उघडलं! नंदूरबारमध्ये गोवाल पाडवी विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.