Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न! साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त; 5 जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक

Latest Crime News : संशयितांकडून ११ लाख ६६ हजार ४८० हजारांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पिस्तूल, गुप्ती, मिरचीपूड, दोरी, लोखंडी पोपटपाना असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
CRIME NEWS
CRIME NEWSesakal
Updated on

Nandurbar Crime : शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्‍वर मंदिरासमोरील रस्त्यावर बुधवारी (ता. २) रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. मात्र दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. संशयितांकडून ११ लाख ६६ हजार ४८० हजारांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पिस्तूल, गुप्ती, मिरचीपूड, दोरी, लोखंडी पोपटपाना असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (Attempted robbery Assets worth eleven half lakhs seized)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबरला रात्री अडीचच्या सुमारास जोगिंदरसिंग बचनसिंग शिकलीकर (वय ३२), इम्रान दिलवर शेख (१९, दोघे रा. सोरापाडा, ता. अक्कलकुवा), निशानसिंग रतनसिंग शिकलीकर (३१, रा. एकतानगर, नंदुरबार, ह.मु. बीआरसी गेट, उधना, सुरत, गुजरात), सुमीत पाडवी व एक अनोळखी व्यक्ती नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्‍वर मंदिरासमोरील रस्त्यावर दरोडा घालण्याच्या तयारीने जात होते.

यातील जोगिंदरसिंग शिकलीकर व इम्रान शेख यांच्या ताब्यात एकूण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, तर अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राउंड, ५०० रुपये किमतीची लोखंडी गुप्ती, १०० रुपयांची एक पांढऱ्‍या रंगाची सुती मिरचीपूड असलेली प्लॅस्टिकची पिशवी, ३६ हजार ४०० रुपयांची रोकड,

त्यात चलनातून बंद करण्यात आलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा, १५ हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन, १०० रुपये किमतीचे कडीकोयंडा तोडण्याकरिता वापरण्यात येणारे लोखंडी साहित्य, १५ हजार रुपयांचा टेक्नोस्पार्क कंपनीचा मोबाईल फोन, ५० रुपयांची अंबूर, दोन लाख ८७ हजार ७०० रुपयांचे ४१.१० ग्रॅम सोन्याचे मणीमंगळसूत्र, एक लाख १४ हजार ७३० रुपयांची १६.३९० ग्रॅम सोन्याची रस्सी चेन,

एक लाख ५४ हजार २१० रुपयांच्या २२.०३० ग्रॅमच्या पाच नग सोन्याच्या अंगठ्या, एक लाख २६ हजार ५६० रुपयांचे १०.०८० ग्रॅम सोन्याचे कानातले चार जोड, तीन हजार २९० रुपयांची ०.७४० ग्रॅमची सोन्याची एक जोड कानातील बुटी, ५१ हजार ५२० रुपयांचे ७.३६० ग्रॅमचे सोन्याचे एक जोड कानातील काप, एक लाख दोन हजार ७६० रुपयांचा १४.६८० ग्रॅमचा सोन्याचा प्लेन नेकलेस, ८१ हजार ९०० रुपयांचा ११.७०० ग्रॅम वजनाचा डायमंड असलेला नेकलेस,

९५ हजार ९०० रुपयांचे १३.७०० ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, १४ हजार रुपयांचे दोन ग्रॅमचे सोन्याचे दोन शिक्के, आठ हजार ८२० रुपयांचे १.२६० ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, ३० हजार ९४० रुपयांचे ४.४२० ग्रॅमचे सोन्याचे नग, सोन्याचे मणी असा एकूण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (latest marathi news)

CRIME NEWS
Hingoli Crime : हिंगोली, नांदेडमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक; १६ मोबाईल, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पाच जणांवर गुन्हा

पोलिस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

CRIME NEWS
Amravati crime : गोळीबारप्रकरणी अरबट यांच्या चालकाची चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.