Nandurbar Crime News : चक्क स्त्रियांच्या वेशात धाडसी चोरी! 5 किलो चांदीची लूट; चोरीची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Crime News : तिजोरीत ठेवलेले चार लाख रुपये किमतीचे पाच किलोचे चांदी आणि त्यासोबतच चांदीला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
Thieves caught on CCTV unlocking the shutters of the Gurukripa Silver shop near the flyover in the city.
& broken cupboard locks to steal
Thieves caught on CCTV unlocking the shutters of the Gurukripa Silver shop near the flyover in the city. & broken cupboard locks to stealesakal
Updated on

Nandurbar Crime News : शहरातील उड्डाणपुलाजवळील गुरुकृपा सिल्व्हर या सराफाच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली असून, संपूर्ण घटनाक्रमच सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महिलांच्या वेश परिधान करून आलेले दोघा चोरट्यांनी शटर तोडत दुकानामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीत ठेवलेले चार लाख रुपये किमतीचे पाच किलोचे चांदी आणि त्यासोबतच चांदीला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यासोबतच संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी करत नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nandurbar Crime burglary as dressed like women)

शहरातील उड्डाणपुलाजवळील कॉम्प्लेक्समध्ये रमेश सोनी यांच्या मालकीचे गुरुकृपा सिल्व्हर नावाचे दुकान आहे. ते चांदीचे दागिने बनविण्याचे काम करतात. गुरुवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात महिलांसारखे पंजाबी ड्रेस परिधान करून येत कॉम्प्लेक्समधील गुरुकृपा सिल्व्हर दुकानाच्या शटरचा पत्रा उचकटून कुलूप तोडले.

त्यानंतर आत गेले. दोघांचेही ड्रेस सारखेच होते. तोंडाला दुपट्टा बांधलेला होता. एक शटरजवळच मध्य बाजूने उभा राहिला, तर दुसऱ्याने दुकानातील कपाटाचे लॉक तोडून त्यात असलेले चांदीचे दागिने एका पिशवीत भरले. त्यानंतर तेथून बिनधास्तपणे निघून गेले. ही घटना पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान घडली.

दरम्यान, नेहमीप्रमाणे मालक रमेश सोनी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना शटर तुटलेले व दुकानातील कपाट तुटलेले दिसले. कपाट तपासले असता तेथून पाच लाखांची चांदी गायब होती. या घटनेची माहिती त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली.

पोलिस निरीक्षक बच्छाव यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोचली. त्यांनी पाहणी केली. तसेच श्‍वानपथकास पाचारण केले. श्‍वानाने पुढेपर्यंत माग दाखविला. रमेश सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (latest marathi news)

Thieves caught on CCTV unlocking the shutters of the Gurukripa Silver shop near the flyover in the city.
& broken cupboard locks to steal
Nagpur Crime : सूनच निघाली सासऱ्याच्या हत्येची ‘मास्टरमाइंड’; ३०० कोटींच्या संपत्तीसाठी दिली सुपारी

चोरटा आनंदाने नाचला

दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुकानात एन्ट्री केल्यानंतर दोघांमध्ये बोलणे झाले. नंतर एक फेर धरून आनंदाने नाचताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दुसरा चांदीचा ऐवज पिशवीत भरताना दिसत आहे.

"सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलो त्या वेळी लक्षात आले, की दुकानात चोरी झालेली आहे. दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे लक्षात आल्याने आम्ही सीसीटीव्ही तपासला. त्यात चोरट्यांनी महिलांचा वेश परिधान करून चोरी केली आहे. साधारण चार लाख रुपये किमतीची पाच किलो चांदी चोरी झालेली आहे. यासोबतच चांदीला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यदेखील चोरी झालेले आहे. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिस प्रशासनाने तातडीने चोरट्यांना पकडावे."

- रमेश सोनी, सराफ दुकानमालक, नंदुरबार

Thieves caught on CCTV unlocking the shutters of the Gurukripa Silver shop near the flyover in the city.
& broken cupboard locks to steal
Nashik Crime: विनातारण कर्जाचे आमिष दाखवून तब्बल 204 जणांना गंडा! ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँकेच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.