Nandurbar Bribe Crime : कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना अटक; घरकुल हप्त्यासाठी घेतले 2 हजार

Latest Crime News : तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदारांच्या घराचे छायाचित्र काढून पुढील कार्यवाही करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी नीलेश पाटील याने दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती.
Bribe Crime
Bribe CrimeESAKAL
Updated on

तळोदा : तळोदा पंचायत समितीचे कंत्राटी गृहनिर्माण अभियंता नीलेश प्रकाश पाटील याला दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता. २८) दुपारी पंचायत समितीच्या आवारात अटक केली. (Contract engineer arrested for accepting bribe)

नीलेश पाटील याने ५५ वर्षीय तक्रारदारांच्या नावे शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केले होते. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते तक्रारदारांना प्राप्त झाले होते. परंतु अनुदानाचा चौथा हप्ता बाकी होता.

तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदारांच्या घराचे छायाचित्र काढून पुढील कार्यवाही करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी नीलेश पाटील याने दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दिली होती. (latest marathi news)

Bribe Crime
Jalgaon Bribe Crime : पारोळ्यात मुख्याध्यापकाने घेतली 10 हजारांची लाच! मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात

त्यानुसार विभागाने सापळा रचून शनिवारी नीलेश पाटील याला तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन हजार रुपये स्वीकारताना अटक केली. तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विजय ठाकरे, देवराम गावित, पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, विलास पाटील, खंडारे, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, हेमंत महाले, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

Bribe Crime
Jalgaon Bribe Crime News : खडकदेवळाच्या सरपंचास लाच स्वीकारताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.