Nandurbar Crime : शहादा परिसरात भूलथापा देऊन लुबाडणारी टोळी सक्रिय! प्रसंगावधानाने कळंबू येथील तरुणाचे वाचले प्राण

Crime News : गेल्या काही दिवसांपासून शहादा शहरासह परिसरात लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

कळंबू : गेल्या काही दिवसांपासून शहादा शहरासह परिसरात लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनेचा तपास करण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने, जनतेमध्ये नाराजी आहे म्हणून लुटारूंचा शोध घेऊन वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Nandurbar Crime Gang active in Shahada area marathi news)

गेल्या काही दिवसांपासून शहादा शहर व परिसरात पुरुष, महिलांच्या अंगावर अथवा जवळ सोने, चांदी अथवा रोख रकमेचा सुगावा घेत, त्या व्यक्तीचा मागोवा घेऊन शहरातील, अथवा काही विशिष्ट ठिकाणाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला जाळ्यामध्ये अडकून अंदाजे काहीतरी गुंगीचे औषध अथवा भूलथापा देऊन अज्ञात स्थळी नेऊन मारहाण करत लुटारूचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सर्रास सुरू असल्याने जनता भयभीत झाली आहे.

नुकतेच १५ मार्चला दुपारी एकच्या सुमारास कळंबू येथील तरुणाला अज्ञात दोन ते तीन व्यक्तींकडून शहरातील सप्तशृंगी मंदिराजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून काहीतरी भूलथापा देऊन प्रकाशा रस्त्यावरील एका हॉटेलच्या मागील बाजूस अज्ञात स्थळी नेऊन मारहाण करत जवळील मोबाईल व चार हजार रुपये रोख चोरून लुटारू पसार झाले.

घटनेनंतर काही तासांनी संबंधित तरुणाला शुद्धी आल्याने, येथून जवळच असलेल्या हॉटेलवरील काही जणांच्या मदतीने भाऊ व नातेवाइकांना संपर्क करून आपबीतीचा उलगडा केला. या वेळी भाऊ, नातेवाईक व मित्र परिवाराने लागलीच घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला शहादा येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. शहादा शहरात याआधीही दोन, तीन घटना घडल्या असून, मात्र लुटारूंचा शोध घेऊन बंदोबस्त करण्यास पोलिस प्रशासन असमर्थ ठरत असल्याचा आरोप संबंधितांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. (latest marathi news)

Crime News
Nagpur Crime: पैसे मागितल्यावर वारंवार करायचा टाळाटाळ, उधारीच्या वादातून बापलेकाचा शेजाऱ्यावर हल्ला; तिघे जखमी

असा झाला उलगडा

कळंबू (ता. शहादा) येथील तरुण आपल्या खासगी कामानिमित्त सकाळी दहाला नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवर शहादा येथे गेले, मात्र दुपारचे दोन वाजले, तीन वाजले अजूनही घरी येत नसल्याने, घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद येत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली. नातेवाईक, मित्र परिवाराने इकडे, तिकडे शोध घेतला, मात्र कुठेही तपास लागत नसल्याने, कुटुंबाची चिंता अधिक वाढली.

त्यानंतर चारनंतर स्वतः तरुणाने हॉटेलजवळ येऊन उपस्थित व्यक्तीला फोन लावण्यासाठी विनंती केली मात्र त्या व्यक्तीला संबंधित व्यक्ती नशेत बडबड करत असल्याचे समजून फोन करण्यास नकार दिला. मात्र थोड्या वेळाने येथे एका व्यक्तीने संबंधित तरुणाला ओळखल्याने त्याने संबंधित तरुणांची मदत करून भावाला माहिती देऊन घटनेविषयी उलगडा केला.

कठोर पावले उचलावीत

जिल्ह्याला काही महिन्यांपूर्वीच पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. हे कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात गुटखा, जुगार, सट्टा, मटका अवैध दारू व्यवसायाला आळा बसला आहे. मात्र शहरीसह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटारू अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने जनता भयभीत झाली आहे. अवैध व्यवसायाबरोबर चोरी, लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा भयभीत जनता करीत आहे.

Crime News
Waluj Crime News : डोक्यात गोळी घालून उद्योजकाचा खून;वाळूज औद्योगिक परिसरातील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.