Nandurbar Crime News : 5 लाख 59 हजारांची दारू वाहनासह जप्त

Nandurbar Crime : गुप्त माहितीच्या आधारे म्हसावद पोलिस ठाण्याने वाहनासह पाच लाख ५९ हजारांची दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.
Officer-in-Charge of Police Station Rajan More and his staff along with confiscated illegal liquor and vehicle.
Officer-in-Charge of Police Station Rajan More and his staff along with confiscated illegal liquor and vehicle.esakal
Updated on

शहादा : गुप्त माहितीच्या आधारे म्हसावद पोलिस ठाण्याने वाहनासह पाच लाख ५९ हजारांची दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत खेड दिगर (ता. शहादा) येथील आंतरराज्य सीमा नाकाबंदी या ठिकाणी सिल्व्हर रंगाच्या स्कार्पिओ (एमएच १८, व्ही ७७७)मध्ये चालक आपल्या ताब्यातील वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे. (Nandurbar Crime Liquor worth 5 lakh 59 thousand seized along with vehicle)

अशी खात्रीलायक माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांना कळवून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने खेड दिगर नाकाबंदी या ठिकाणी दोन पथकांनी सापळा रचला.

रात्री दहाच्या सुमारास चालक त्याच्या ताब्यातील वाहनात बिअर बॉक्स व चार लाख ५० हजार किमतीचे स्कॉर्पिओ वाहन असा एकूण पाच लाख ५९ हजार ४४० रुपये किमतीच्या मुद्देमाल घेऊन जात असताना छाप्यात थांबविले असता तो पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. (latest marathi news)

Officer-in-Charge of Police Station Rajan More and his staff along with confiscated illegal liquor and vehicle.
Crime News: पोलिसांची अजून एक कारवाई; गावठी कट्ट्यासह फिरवणाऱ्या तरुणाला अटक

चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, गुन्ह्याचा तपास सुनील पाडवी करीत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, सुनील पाडवी, जितू पाडवी, बहादूर बिलाला.

शैलेशसिंग राजपूत, दादाभाई साबळे, उमेश पावरा, अजित गावित, राकेश पावरा यांनी कारवाई केली. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनी मार्गदर्शन केले.

Officer-in-Charge of Police Station Rajan More and his staff along with confiscated illegal liquor and vehicle.
Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.