Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार सुलतान, सूरजला अटक

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नंदुरबार : शहाद्यातील श्री. जीवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टच्या श्री. सुघोषाघंट मंदिरातील सात दानपेट्या चोरून नेत एक लाख ३० हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबविली होती. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकऱणी सुलतान व सूरज या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली आहे. त्यांच्यावर आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Crime News
Crime News: इंजिनिअरची विचित्र पद्धतीनं आत्महत्या, तोंड प्लॅस्टिक पिशवीनं तर...

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार शहाद्यातील जैन मंदिरातील चोरीत मध्यप्रदेशमधील कुख्यात गुन्हेगार सुल्तानशेख व सूरज ठाकूर यांचा हात असल्याने त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथक सनावद (जि. खरगोन) येथे पाठविले.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सुल्तान व सूरज ठाकूर यांचे राहण्याचे ठिकाण शोधत त्यांच्या घराच्या परिसरात वेषांतर करुन सापळारचला. बुधवारी (ता.२१) पहाटे चारच्या सुमारास घरात प्रवेश करताना दोघे दिसले.

पथकाने त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. सुल्तान शेख रशिद शेख (१९, रा. लाचीवाडा, मोठी मशिदच्या बाजूला, दाहोत गुजरात) ह. मु. सनावद ( जि. खरगोन मध्यप्रदेश) तर दुसरा सूरज नवलसिंग ठाकूर (२०,रा. अकोला, (महाराष्ट्र, ह. मु. सनावद, काठीबेडी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शहादा येथील मंदिरातील चोरीबाबत विचारले असता त्यांनी कबुली दिली.

Crime News
Crime News : 60 वर्षाच्या साधूची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे; साधूनं मुस्लिम धर्म सोडून स्वीकारला होता हिंदू धर्म

सुल्तानच्या बॅगेतून ४१ हजार ३१० रुपये रोख व सूरज ठाकूरच्या बॅगेतून ३९,८०० रूपये रोख असा एकूण - ८१ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी गतकाळात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मंदिरातून अशाच प्रकारची चोरी केलेली असल्याचे सांगितले. त्यांनी मनमाड, चांदवड, अकोला, फ्रेजरपुरा (अमरावती), आडगाव (नाशिक), मंडलेश्वर (मध्यप्रदेश) येथे गुन्हे दाखल हेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.