Nandurbar Crime News : महिलांचा वेश धारण करून सराफाला लुबाडणारे अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nandurbar Crime : नंदुरबार शहरातील विमल प्लाझा कॉम्प्लेक्समधील गुरूकृपा ज्वेलर्स येथे चोरट्यांनी महिलेचे कपडे परिधान करून ५ लाख ६४ हजार ३०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेले होते.
Crime
Crimeesakal
Updated on

Nandurbar Crime News : नंदुरबार शहरातील विमल प्लाझा कॉम्प्लेक्समधील गुरूकृपा ज्वेलर्स येथे चोरट्यांनी महिलेचे कपडे परिधान करून ५ लाख ६४ हजार ३०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेले होते. ही घटना ५ ते ६ जूनच्या सकाळी घडली होती. याबाबत संजय हिरालाल सोनी यांच्या तक्रारीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या घटनेतील संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले. (Robbery of bullion disguised as woman arrested )

त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. ज्या व्यक्तीला एवज विक्री केला त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ५ ते ६ जूनच्या सकाळी चोरट्यांनी गुरूकृपा ज्वेलर्स या दुकानातून महिलांचा वेश परिधान करून चोरी केली होती. दुकानाचे शटर उघडण्यापासून तर चोरी करतांनाच्या सर्व हालचाली व जातांनाच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे श्री सोनी दुकान उघडण्यासाठी आल्यावर ही घटना लक्षात आली होती.

त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. पोलिसांचे पथक दाखल होऊन श्‍वान पथकामार्फत माग काढण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असताना १४ जून रोजी पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील बंटी, रा. सीबी पेट्रोल पंपाच्या मागे याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली.

Crime
Nandurbar Crime News : जिल्हा पोलिसांच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

संशयित पेट्रोल पंप परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. खेडकर, दिनेश भदाणे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलिस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलिस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने संशयितांना बेड्या ठोकल्या. संशयित विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले. त्याला विश्‍वासात घेतले असता त्याने साथीदार दीपक ऊर्फ भुत्या भिका पाडवी (वय १९, रा. वाघोदा, ता. जि. नंदुरबार) याच्या मदतीने महिलांचे कपडे परिधान करुन रात्रीच्यावेळी दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलिस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलिस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी कारवाई केली.

खरेदीदारालाही ठोकल्या बेड्या

गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल नंदुरबार शहरातील नदीम उर्फ गोल्डन यास विक्री केल्याचे संशयितांनी सांगितले. त्यान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने शहरातील कुरैशी मोहल्ला परिसरात नदीम शेख उर्फ गोल्डन रहीम मेहतर (वय ३३, रा. बिस्मील्ला चौक, कुरैशी मोहल्ला, नंदुरबार) याला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अनिल गोसावी तपास करीत आहेत.

Crime
Nandurbar Crime News : दुचाकीचोरांच्या टोळीस पिंपळनेर पोलिसांकडून बेड्या; 6 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.