Nandurbar Cyber Crime : तळोद्यातील शेतकऱ्याची ऑनलाइन फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

Latest Cyber Crime News : शेतकऱ्याने फसवले गेल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

तळोदा : तुमच्या बँक खात्यात नजरचुकीने माझे ३५ हजार टाकले गेले आहेत, असा बनाव करत ते पैसे परत करण्याचा तगादा लावत शेतकऱ्याला पैसे परत करायला लावून शेतकऱ्याची २२ हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शेतकऱ्याने फसवले गेल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे फंडे पाहता अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Online fraud of farmer in Taloda)

शहरातील काकाशेठ गल्लीत राहणारे सुधाकर पिंपरे या शेतकऱ्याला ९५५३२ ३९१८४ या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. त्यात हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या बँक खात्यात माझ्याकडून नजरचुकीने ३५ हजार रुपये टाकले गेले आहेत. ते पैसे मला परत हवे आहेत. मी आता दवाखान्यांमध्ये उभा असून, मला त्या पैशांची गरज आहे.

पुरावा म्हणून त्याने त्याच्या बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचा ‘एसएमएस’ त्या शेतकऱ्याला पाठवला. मात्र, शेतकऱ्याने सांगितले की मी तपास करून घेतो. परंतु, त्याने दवाखान्याचे कारण देत कॉल कट करू दिला नाही. त्यानुसार शेतकऱ्याला वाटले की खरंच आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. (latest marathi news)

Cyber Crime
Nashik Cyber Crime : शेअर मार्केटच्या आमिषाला भुलून 93 लाखांना गंडा! अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल 

म्हणून शेतकऱ्याने त्याने सांगितलेल्या क्रमांकावर गुगल पेद्वारे चौदा हजार, पाच हजार, दोन हजार ५०० रुपये व एक हजार रुपये असे चारवेळा पैसे पाठवले. त्यानंतर शेतकऱ्याने आपले खाते तपासले असता असे कोणतेही पैसे बँक खात्यात जमा झालेले नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच शेतकऱ्याने बँकेत जाऊन चौकशी करीत तक्रार नोंदवली. तसेच, सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, अशाप्रकारे पैसे टाकले गेल्याचा व दवाखान्याचे काम असल्याचा बनाव करून ऑनलाईन फ्रॉड करण्याचा नवीन फंडा भामट्यांनी शोधून काढल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे दिवस असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, गेलेले पैसे परत मिळतील की नाही, याची चिंता शेतकऱ्याला लागून राहिली आहे.

Cyber Crime
Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांनी 70 लाखांना गंडविले! दोन वेगवेगळ्या घटनांचे गुन्‍हे दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.