बोरद : दरवर्षी बोरद परिसरामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. यावर्षी देखील मे महिन्यात बऱ्यापैकी कापसाची लागवड झाली. ज्यांच्याकडे पाणीसाठा होता अशा शेतकऱ्यांनी मे महिन्यातच कापसाची लागवड केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे पांढरे सोने कालवंडण्याची शक्यता असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. (decline in production of cotton in Broad area )