Nandurbar News : लोकनायक सूतगिरणीच्या अध्यक्षपदी दीपक पाटील

Nandurbar News : लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी दीपक पाटील, तर उपाध्यक्षपदी हरिदास सदाशिव पाटील (तऱ्हाडी त.बो.) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
Deepak Patil
Deepak Patilesakal
Updated on

Nandurbar News : कमलनगर उंटावद-होळ (ता. शहादा) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी दीपक पाटील, तर उपाध्यक्षपदी हरिदास सदाशिव पाटील (तऱ्हाडी त.बो.) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही आघाडीचे उमेदवार सर्व २१ जागांवर निवडून आले होते. शनिवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सूतगिरणी साइटवर विशेष बैठक आयोजित झाली. (Nandurbar Deepak Patil as President of Loknayak Sutgirni)

या वेळी अध्यक्षपदी सर्वानुमते दीपक पाटील, तर पहिल्या वर्षी उपाध्यक्षपदी हरिदास सदाशिव पाटील यांची निवड करण्यात आली. दर वर्षी संचालकांमधून उपाध्यक्षपदी निवड करण्यात येणार असून, तसे अधिकार अध्यक्ष दीपक पाटील यांना देण्यात आले आहेत. या वेळी सुरत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनीलभाई पटेल, गुजरात गुर्जर महासभेचे जगदीश पाटील.

खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, माधव पाटील, उद्धव पाटील, प्रेमसिंग अहेर, घनश्याम चौधरी, रामचंद्र पाटील, डॉ. भगवान पाटील, महेंद्र पाटील, अनिल भामरे, रमेशचंद्र जैन, सुनील पाटील, रवींद्र रावल, राजाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील, अरविंद पाटील, ईश्वर पाटील, आनंदराव पाटील, जयप्रकाश पाटील,

जगदीश पाटील, डॉ. ओंकार पाटील, गिरधर पाटील, प्रकाश पाटील, ईश्वर मंगेश पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, मयूर पाटील, मोतीलाल जैन आदी उपस्थित होते. माजी संचालक के. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मकरंद पाटील यांनी आभार मानले. या वेळी लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या आजी-माजी संचालकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक उपस्थित होते. (latest marathi news)

Deepak Patil
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गुगलीने अनेकांना धक्का!

सहकार चळवळीसाठी प्रयत्नशील

या वेळी मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष हरिदास पाटील आणि सर्व विद्यमान व माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला. पुन्हा सूतगिरणीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना दीपक पाटील म्हणाले, की सर्वदूर सूतव्यवसाय व सहकार क्षेत्रात समस्या निर्माण झाल्याचे सर्वज्ञात आहे.

आपली सूतगिरणी सद्यःस्थितीत आर्थिक अडचणीतून जात आहे. अशाही परिस्थितीत सभासदांनी लोकशाही आघाडीवर विश्वास ठेवत सर्वच २१ संचालक निवडून दिले आहेत. शेतकरी सभासदांनी पुनश्च आपल्यावर विश्वास टाकला असून, परिसर विकास व सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.

सूतगिरणी सुरू करण्यासह शेतकरी सभासद व संबंधित सर्वांची देणे देण्यासाठी आपण बांधील आहोत. सहकारात काम करणाराच चुकतो. चुकीतून योग्य बोध घेऊन पुढे वाटचाल करण्यातच खरे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Deepak Patil
Nandurbar Lok Sabha 2024: जुन्या पटावर ‘जुनीच’ प्यादी! गावितांना उमेदवारी देऊन भाजपची सुरक्षित खेळी तर काँग्रेसने पाडवींच्या मुलाला दिली संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.