Nandurbar News : पळसाच्या पानांच्या पत्रावळी हद्दपार; प्लॅस्टिक पत्रावळींनी घेतली जागा

Nandurbar News : लग्न, वाढदिवस, कारण यासह विविध कार्यक्रमांच्या जेवणात हमखास दिसणाऱ्या पळसाच्या पत्रावळी आता जवळपास हद्दपार झाल्या आहेत.
plates of Palash
plates of Palashesakal
Updated on

तळोदा : लग्न, वाढदिवस, कारण यासह विविध कार्यक्रमांच्या जेवणात हमखास दिसणाऱ्या पळसाच्या पत्रावळी आता जवळपास हद्दपार झाल्या आहेत. स्वस्त व पर्याय म्हणून प्लॅस्टिक पत्रावळींचा वापर आता होताना दिसून येत आहे. मात्र त्यामुळे आरोग्यवर्धक पळसाच्या पत्रावळींना नागरिक मुकत आहेत, तसेच त्यातून स्थानिकांचा रोजगारदेखील बुडाला आहे, असे बोलले जात आहे. (plates of Palash)

पळसाच्या पानावर जेवणाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आता लोप पावत आहे. कमी मेहनतीने व कमी कष्टात उपलब्ध होणाऱ्या सध्याच्या यंत्रयुगात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यातूनच पानांची पत्रावळी दुर्मिळ झाली असून, प्लॅस्टिक पत्रावळीचा वापर सर्रास होऊ लागला आहे. यामुळे पर्यावरण समतोल ढासळत आहे.

लग्न, वाढदिवस, कारण यासह आणि सार्वजनिक ठिकाणचे भोजन अशा ठिकाणी स्वस्त पर्याय स्वीकारले जाऊ लागले आहेत. परिणामी, पानांची पत्रावळी बनविणारे कारागीर हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असलेल्या पानाच्या पत्रावळी गायब झाल्या आहेत. त्याऐवजी प्लॅस्टिक पत्रावळींनी जागा घेतली आहे.

लग्नसमारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांत जेवणासाठी मोहफूल झाडाच्या किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरत असत. त्यामुळे स्थानिकांचा पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे हा छोटेखानी रोजगार मागणी कमी होत असल्याने बंद झाला आहे.सध्याच्या घडीला फक्त पानाच्या पत्रावळीचा उपयोग फक्त देवदेवतांना नैवेद्य दाखविण्यासाठी करतात. (Latest Marathi News)

plates of Palash
Nandurbar Drought News : पाण्याची पातळी खोल; बोअरवेल्स कोरडेठाक

पूर्वी पानाच्या पत्रावळी तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होत असे. जंगल परिसरात जाऊन पळसाच्या झाडाची मोठमोठी पाने तोडून आणल्यानंतर सायंकाळी जेवणानंतर कुटुंब एकत्र येऊन गमतीजमतीच्या चर्चेतून पत्रावळ तयार होत. त्यापासून कुटुंबीयांना दोन महिने पत्रावळी व्यवसायातून चांगला मोबदला मिळून आर्थिक मदत व्हायची; परंतु आता यंत्रयुगात हाताने तयार करण्यात येणाऱ्या पानाच्या पत्रावळी गायब झाल्या आहेत.

आरोग्यवर्धक पळसाच्या पत्रावळी

प्लॅस्टिक पत्रावळी व द्रोण विघटन होत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणप्रेमींना त्याचे दुःख होत असून, पानाच्या पत्रावळी उपलब्ध झाल्यास त्यांचा आनंदाने स्वीकार करतील; परंतु काळाच्या ओघात पानाच्या पत्रावळी मिळणे शक्य नाही. कारण प्लॅस्टिक पत्रावळीचा उपयोग वाढल्यामुळे पानाच्या पत्रावळी तयार करणाऱ्या कुटुंबीयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने पानाच्या पत्रावळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

स्थानिकांचा रोजगार बुडाला

पुरातन काळापासून मंगलप्रसंगी जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेल्या पत्रावळी सध्या लोप पावत असून, पानटपरीवालेही सध्या पार्सल, मावा आदी वस्तू पानात बांधून न देता कागद, प्लॅस्टिकमध्ये देत असल्याने पळसाच्या पानांची मागणी घटली आहे. त्यामुळे पानांची मागणी नसल्याने स्थानिकांच्या रोजगाराचे साधन बंद झाले आहे..

plates of Palash
Nandurbar Lok Sabha Constituency : लढाई मुलांची, पण लढताहेत पालकच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.