Nandurbar News : शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदान जाहीर केले आहे. शासनाने ते संबधित शेतकऱ्यांचा नावाने मंजुरी देऊन प्रशासनाकडे पाठविले आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करूनही शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. जिल्ह्यात काही भागात ओला, तर काही भागात कोरडा दुष्काळ पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातून गेली होती. (Nandurbar Despite doing E-KYC farmers in district are deprived of drought subsidy)
शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांचे अतोनात झालेले नुकसान पाहता शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. त्यासाठीही शेतकऱ्यांना महसूल विभागाची अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागली होती.
जेमतेम पंचनामे झाले. शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. शासनाने अनुदान मंजूर केले खरे, मात्र ते शेतकऱ्यांच्या खिशात अद्याप पडलेले नाही. शासनाने मंजुरी देत यादी प्रशासनाकडे पाठविली. निधी बॅंकेत जमा झाला. (latest marathi news)
मात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नव्हते. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी ई-केवायसीसाठी साइट सुरू होत नसल्याची अडचण येत होती. जेमतेम ती झाली तर एकदमच सायबर कॅफेवर शेतकऱ्यांची गर्दी झाली. दिवसदिवसभर बसूनही कामे झाले नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागले. तेव्हा ई-केवायसी पूर्ण झाले.
आता ई-केवायसी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शिवसेनेचे कृष्णदास पाटील यांनी अखेर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना सोशल मीडियावरून निवेदन सादर केले आहे. आता पुढे काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.