Nandurbar News : ‘जलजीवन’ चौकशीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धरणे! आंदोलनात सहभागी होण्याचे खासदार ॲड. गोवाल पाडवींचे आवाहन

Nandurbar News : जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार असून आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी केले आहे.
Adv. Gowal Padavi
Adv. Gowal Padaviesakal
Updated on

Nandurbar News : जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार प्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकले असून, १६ जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याच्या इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.

आंदोलनात १० हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार असून आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी केले आहे. (Dharna at ZP on Tuesday for Jal Jeevan enquiry MP Adv Gowaal Padavi appeal)

नंदुरबार नगरपरिषदेचा स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात गुरुवारी खा. ॲड गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जि. प. माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक,सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते

खा. पाडवी म्हणाले, की मागील काही कालावधीपासून जिल्हा परिषदेत योजनांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे. जलजीवन सारख्या महत्त्वकांशी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी १६ जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Adv. Gowal Padavi
Ladki Bahin Yojana: अंगणवाडी केंद्राची झाली मिनी सेतू केंद्रे! बालकांच्या शिक्षण, संगोपन वाऱ्यावर? सेविकांना अतिरिक्त काम

तर जेलमध्ये जायला तयार : उदेसिंग पाडवी

कुठलाही सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती नसताना जिल्हा प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी मनाई आदेश जारी केला होता. आता मनाई आदेश जारी केला तरी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

"बांधकाम व इतर विभागातील कामांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला मुख्य कार्यालय व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित होत आहेत.कृषी विभागांतर्गत झालेल्या सौर दिव्यांच्या निविदा प्रक्रियेत देखील अनियमितता झाली असून, त्याची चौकशी व्हावी."- अभिजित पाटील, सभापती, बाजार समिती शहादा

"कुठलीही योजना जनतेने दिलेल्या करातून राबविण्यात येत असते. योजनेत जनतेची दिशाभूल झालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत जल जीवन मिशन योजनेच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहू देऊ."- ॲड राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Adv. Gowal Padavi
Dhule News : रस्ते, पुलांसाठी 62, पाझर तलाव दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.