नंदुरबार : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर करून आपल्याला गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला वेळोवेळी प्रतिसाद देणारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे तसेच केंद्रातील अन्य मान्यवरांचे आभार त्यांनी मानले. (manmad Indore railway line will benefit nandurbar constituency)=