Nandurbar News : आमचूर प्रक्रिया उद्योगासाठी 8 कोटींचा निधी : डॉ. विजयकुमार गावित

Latest Marathi News : धडगाव तालुक्यात बचतगटांना शेळीवाटप, महिला, गृहिणींना गॅस कनेक्शन वितरण व वनपट्टेधारकांना लाभाच्या योजनांचे वितरण करताना ते बोलत होते.
While distributing gas grates to the women of Akkalkuwa Taluka, Minister Dr. Vijayakumar Gavit, MP Dr. Heena Gavit and Adhikari
While distributing gas grates to the women of Akkalkuwa Taluka, Minister Dr. Vijayakumar Gavit, MP Dr. Heena Gavit and Adhikariesakal
Updated on

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे दोन हजार गायींचे वितरण करण्यात येणार असून, आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोन्ही तालुक्यांसाठी सुमारे सव्वाआठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr Vijaykumar Gavit) यांनी दिली. (Nandurbar Dr Vijayakumar gavit marathi news)

धडगाव तालुक्यात बचतगटांना शेळीवाटप, महिला, गृहिणींना गॅस कनेक्शन वितरण व वनपट्टेधारकांना लाभाच्या योजनांचे वितरण करताना ते बोलत होते. खासदार डॉ. हीना गावित, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथूर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, देवेंद्र वळवी व पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी भागातील सर्व रस्ते जूनअखेरपर्यंत पूर्णत्वास येतील. या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रुग्णालये, तालुका मुख्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा थेट रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे दळणवळण व त्या भागातील उद्योग-व्यवसायांच्या भरभराटीसही चालना मिळणार आहे.

त्यात दुधाळ गायींचे वाटप केल्याने दुग्धव्यवसाय भरभराटीस येणार आहे. वनपट्टेधारकांना शेळ्यांचेही वितरण केले जाणार आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचेही वितरण करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

While distributing gas grates to the women of Akkalkuwa Taluka, Minister Dr. Vijayakumar Gavit, MP Dr. Heena Gavit and Adhikari
Dhule News : छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर त्यांना यातना होतील : संजय आवटे

महिलांच्या आरोग्य जीवनात आमूलाग्र बदल

खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली आदिवासी, दुर्गम भागातील महिलांचे चुलीच्या धुरापासून बिघडणारे आरोग्य लक्षात घेऊन उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्य जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे.

येणाऱ्या काळात आदिवासी दुर्गम भागातील महिलांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात ४२ गटांना शेळीगट प्रमाणपत्र, ८८१ महिलांना गॅस कनेक्शन, तर १०३ वनपट्टेधारकांना प्रत्येकी १० शेळी, बोकड वितरण करण्यात आले.

While distributing gas grates to the women of Akkalkuwa Taluka, Minister Dr. Vijayakumar Gavit, MP Dr. Heena Gavit and Adhikari
Nandurbar News : जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रत्येक तालुक्यात भरारी पथके कार्यान्वित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.