Nandurbar Tribal Devlopment : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न : डॉ. विजयकुमार गावित

Tribal Devlopment : सोयी-सुविधांनी युक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले.
Tribal Development Minister Dr. Dr. Bhoomi Pujan and dedication of 120 ashram schools and hostel buildings in the state on Wednesday through visual system. Vijayakumar Village.
Tribal Development Minister Dr. Dr. Bhoomi Pujan and dedication of 120 ashram schools and hostel buildings in the state on Wednesday through visual system. Vijayakumar Village.esakal
Updated on

नंदुरबार : गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तीन हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापूर्ण आणि सोयी-सुविधांनी युक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले. नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. (Dr Vijayakumar gavit statement of Efforts to provide quality education to tribal students)

शहरातील पटेलवाडीस्थित आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाच्या प्रांगणातून मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते राज्यातील दोन हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या १२० इमारतींचे दृरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, दृकश्राव्य प्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे, बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह राज्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार), प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील (धुळे), आदिवासी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता नीरज चौरे आदींसह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वसतिगृहांचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर शिक्षण विभागात कशी सुधारणा करता येईल, यासाठी योजनांचे काही नियोजनबद्ध आराखडे तयार करून त्याच्या पूर्णत्वासाठी काम केले. (latest marathi news)

Tribal Development Minister Dr. Dr. Bhoomi Pujan and dedication of 120 ashram schools and hostel buildings in the state on Wednesday through visual system. Vijayakumar Village.
Nashik Tribal Development : आदिवासी विकास विभाग; आश्रमशाळांचे 100 टक्के निकालाचे उद्दिष्ट

आदिवासी बांधवांना जोपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही, त्याबद्दल जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवांना घेत नाही तोपर्यंत आदिवासी विकास विभागाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळेच शिक्षणाची अद्ययावत दालने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी केली. डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन जिल्ह्याचे आणि समाजाचे नाव उंचावण्यासाठी ध्येय बाळगण्याची आवश्‍यकता आहे. सचिव विजय वाघमारे यांनी विभागाच्या विविध योजनांसोबत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी चांगले काम करत असल्याचे सांगितले.

शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न

आज राज्यातील आदिवासी विकास विभागाची ज्या ठिकाणी स्वमालकीची जागा उपलब्ध आहे. त्या प्रत्येक ठिकाणी इमारतींना निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात एकाचवेळी दोन हजार ३०० कोटी रुपयांच्या १२० इमारतींचे भूमिपूजन आणि उद्घघाटन आपण केले आहे. यात ४६ इमारती या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. ४६ पैकी ३० इमारती अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील असल्याने शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा आमचा ध्यास असल्याचे या वेळी डॉ. गावित सांगितले.

Tribal Development Minister Dr. Dr. Bhoomi Pujan and dedication of 120 ashram schools and hostel buildings in the state on Wednesday through visual system. Vijayakumar Village.
Nashik Tribal News : आदिवासी विभागाच्या निधीला कात्री; लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेना निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.