Nandurbar News : बचतगटाच्या मध्यमातून ‘आपल्या गावात आपला रोजगार’ : डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar : प्रत्येक महिला बचतगटाला आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रुपये दिले जात आहेत.
Speaking at benefit distribution of various individual and community schemes organized by the Integrated Tribal Development Project, Dr. Vijayakumar gavit .
Speaking at benefit distribution of various individual and community schemes organized by the Integrated Tribal Development Project, Dr. Vijayakumar gavit .esakal
Updated on

Nandurbar News : प्रत्येक महिला बचतगटाला आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रुपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून, त्यासाठी बचतगटांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्यामुळे आपल्या गावात आपला रोजगार निवडण्याचे स्वातंत्र्य आदिवासी महिलांना मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. (Nandurbar Dr Vijaykumar gavit statement village employment through medium of savings group)

ते शनिवारी (ता. ९) तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे झालेल्या विविध वैयक्तिक व सामुदायिक योजनांच्या लाभ वितरणप्रसंगी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, आदिवासी सेवक डॉ. शशिकांत वाणी, रूपसिंग पाडवी, जितू महाराज, यशवंत ठाकरे, दिलीप ठाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून घरकुले, वैयक्तिक व सामुदायिक शेळी गटवाटप, महिलांना गायींचे वितरण तसेच गावातील तरुणाईमध्ये खेळ भावना रुजावी व्हावी यासाठी क्रिकेट साहित्य व भजनी मंडळांना वाद्यवृंद व तद्आनुषंगिक साहित्य वितरित केले जात आहे.

आदिवासी भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी जे उपक्रम व योजना राबविता येतील ते उपक्रम व योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ते म्हणाले, की प्रत्येक वाडापाड्याला जोडणारे जोडरस्ते बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायतींना या रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत.

Speaking at benefit distribution of various individual and community schemes organized by the Integrated Tribal Development Project, Dr. Vijayakumar gavit .
Nandurbar News : बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे आंदोलन सुरू

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पेयजल दिले जाणार असून, आता शासकीय योजना जनतेच्या गरजेप्रमाणे राबविली जाणार आहे, त्यासाठी एखादा स्थानिक पातळीवर शेतीपूरक उद्योग निवडायचा आहे. त्याला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न येणाऱ्या काळात शासनामार्फत केला जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. गावित, खासदार डॉ. गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

असे झाले लाभ वितरण

या वेळी वैयक्तिक शेळी प्रमाणपत्र वाटप ६०, महिला बचतगट शेळी वाटप ३१, महिलांना गायींचे निवड प्रमाणपत्र ७१, क्रिकेट संच साहित्य १०५, ६७ बचतगटांना प्रत्येकी रुपये १० हजार अर्थसहाय्य, ९० भजनी मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले.

Speaking at benefit distribution of various individual and community schemes organized by the Integrated Tribal Development Project, Dr. Vijayakumar gavit .
Nandurbar News : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.