Nandurbar Drought News : सातपुड्याच्या दुर्गम भागात दुष्काळाचे सावट

Nandurbar News : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग समजले जाणारे बोदला गाव सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे.
crowd of women at single hand pump, women and children carrying water.
crowd of women at single hand pump, women and children carrying water.esakal
Updated on

सागर निकवाडे : सकाळ वृत्तसेवा

धडगाव : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग समजले जाणारे बोदला गाव सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. बोदला गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोंगराळ भागातून वाट काढावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी या महिलांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. (Nandurbar Drought in remote areas of Satpura)

एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या बोदला येथे पंचवीसहून अधिक हातपंप आणि विहीर असून, त्या मार्च महिन्यातच आटल्याने या ग्रामस्थांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावात असलेला हा एकमेव हातपंप आता ३०० कुटुंबीयांची तहान भागवत आहे. आपल्या लहान लेकरांना हाताशी घेऊन या आदिवासी महिला एक ते दोन किलोमीटर पायपीट करून हातपंपावर पाणी भरण्यासाठी येतात.

मात्र एकमेव असलेल्या हातपंपावर पाणी भरणाऱ्यांची गर्दी जास्त होते. गर्दीमुळे त्या ठिकाणी नंबरदेखील लावावा लागतो. त्यातच पंपाचे पाणी आटले तर ते चार तास पाण्याची वाट बघत तेथेच थांबवे लागत असल्याचे विदारक चित्र सातपुड्यात पाहायला मिळत आहे. गावात असलेला हा एकमेव हातपंप बंद झाला तर येणाऱ्या काळात या ग्रामस्थांना याहून अधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

"आमच्या गावाला सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, जनावरांना पाणी द्यायचे कसे, हा प्रश्न आता आमच्यासमोर उपस्थित होतोय." -दिवाल्या ठाकरे, वावी गाव (Latest Marathi News)

crowd of women at single hand pump, women and children carrying water.
Nandurbar News : डॉ. हिना गावित यांनी घेतली चंद्रकांत रघुवंशी यांची भेट!

"आमच्या गावाची लोकसंख्या दीड हजार असून, गेल्या मार्चमध्ये आमच्या गावातील वीसहून अधिक हातपंप आणि विहिरी कोरड्या झाल्या आहेत. एकच हातपंप सुरू असून, महिलांना पाण्यासाठी एक ते दोन तास ताटकळत उभे राहावे लागत असून, त्यात महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गर्भवतीदेखील या ठिकाणी पाणी भरायला येतात. यासोबतच लहान लहान लेकरांना घेऊन महिला तासन् तास पाणी भरतात. त्यांना घरातील काम करण्यातदेखील अडचणी येत आहेत." -गमली पावरा, आशासेविका, बोदला

"पूर्वी आमचे गाव सुजलाम सुफलाम होते. मोठ्या प्रमाणात जंगल आमच्या भागात असल्याने आणि पावसाळ्यातदेखील चांगला पाऊस पडत होता. यामुळे यापूर्वी कधीही आम्हाला पाण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत नव्हता मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे." -रेवा पावरा, ज्येष्ठ नागरिक

crowd of women at single hand pump, women and children carrying water.
Nandurbar Summer Heat : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी; उन्हाचा तीव्रेतेत वाढ, उकाडाने नागरिक हैराण

"आमचे गाव सातपुडा या दुर्गम भागात वसल्यामुळे अनेक वस्त्या डोंगराळ भागात आहेत. गावात एकच हातपंप सुरू असल्यामुळे डोंगराळ भागातून पायपीट करत एक ते दोन किलोमीटरवर जाऊन महिलांना पाणी आणावे लागते. अनेक निवडणुका येतात आणि जातात मात्र आमच्या मतदारसंघातील आमदार कधीही आमच्या गावाला आलेला नाही. त्यामुळे त्यांना आमच्या समस्येची जाणीवदेखील नाही. आम्ही मतदान करावे का नाही करावे असाही कधी-कधी प्रश्न पडतो. सरकारपुढे हात पसरावा लागत आहे." -राहुल पटले, गावातील तरुण

"संभाजीनगर येथे एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सैनिकी शाळेत शिक्षण घेत आहे. मात्र सध्या सुट्या असल्याने आपल्या गावी आले आहे. गावी आल्यानंतर आईची तळमळ पाहायला मिळते. आईला दोन ते तीन किलोमीटर भरउन्हात पाणी आणताना बघून मला खूप त्रास होतो. शहरात एका बटणावर आम्हाला पाणी मिळते, मात्र गावाकडे आल्यावर अनेक वर्षांच्या समस्या ‘जैसे थे’ पाहायला मिळतात. अजून किती वर्षे माझ्या आईसारख्या अनेक महिलांना अशा दोन ते तीन किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ येणार आहे." -भारती पावरा, विद्यार्थिनीथ

crowd of women at single hand pump, women and children carrying water.
Nandurbar Lok Sabha Constituency : लढाई मुलांची, पण लढताहेत पालकच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.