Nandurbar News : व्यवस्थापकाअभावी बँकेचे व्यवहार खोळंबले; तळोदा येथील शाखेत दीड महिन्यापासून पद रिक्त

Nandurbar : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, तळोदा येथे दीड महिन्यापासून व्यवस्थापकाचे पद रिक्त आहे.
Central Bank of India
Central Bank of Indiaesakal
Updated on

Nandurbar News : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, तळोदा येथे दीड महिन्यापासून व्यवस्थापकाचे पद रिक्त आहे. दीड महिन्यापूर्वी येथील व्यवस्थापक मोहन भालेकर यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर नवीन व्यवस्थापक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांची खरीप पीककर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज तसेच बॅंकेच्या व्यवहारासंबधी कामे खोळंबली असून, तत्काळ व्यवस्थापक नियुक्त करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. (Nandurbar Due to lack of manager bank business is disrupted )

त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने तातडीने दखल घेऊन व्यवस्थापक नियुक्त करावेत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत मागील दीड महिन्यापासून व्यवस्थापकाचे पद रिक्त आहे. रिक्त पदामुळे बँकेतील व्यवहार खोळंबले असून, ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आधीच बँकेत केवळ तीन कर्मचारी असून, रोखपाल तसेच बँकेचे एक अधिकारी व शिपाई अशा तीन कर्मचाऱ्यांवर बँकेच्या गाडा सुरू असून, दोन कर्मचारी रोजंदारीने लावण्यात आले आहेत.

बँकेत हजारो नागरिकांचे खाते असून, पेन्शनर्स, नोकरदार तसेच शेतकऱ्यांचे बचत व कर्ज खाते आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधीदेखील बँकेत येत असतो. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक बँकेत नेहमीच येत असतात. अशी सर्व परिस्थिती असताना बँकेचे प्रमुख असलेले व्यवस्थापकपदच रिक्त असल्याने बँकेच्या व्यवहारांना खीळ बसली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे खरीप पीककर्जाचे प्रस्ताव बँकेत जमा केले असून, व्यवस्थापकाअभावी ते सर्व प्रस्तावांची कर्ज मंजुरीची प्रक्रिया खोळंबली आहे. (latest marathi news)

Central Bank of India
Nandurbar News : चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; सुदैवाने जीवित हानी नाही

दुसरीकडे सध्या खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचे नियोजन केले आहे. ऊस कर्ज, खरीप कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून घेण्याचा शेतकऱ्यांचा कल असतो. अशा सर्व शेतकऱ्यांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्ज प्रकरणे व्यवस्थापकाअभावी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बँकेत फिरफिर सुरू आहे. त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ व्यवस्थापक नियुक्त करावा. त्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेनेही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व सामान्य ग्राहकांनी केली आहे.

सर्वच सेवांना खीळ

बँकेतील व्यवहार हीसुद्धा एक गरजेची बाब झाली आहे. त्यासाठी ग्राहकांची बँकेत नेहमीच गर्दी होत असते. त्यासाठी ऑनलाइन बँकिंग, फोन बँकिंग अशा सुविधादेखील पुरविल्या जातात. मात्र तरी खात्यासंबधी तक्रारी, पीककर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज अशा कामांसाठी व्यवस्थापकाची गरज असते. त्यातही बँकेच्या व्यवहारावर त्यांचे नियंत्रण राहत असल्याने हे पद महत्त्वाचे मानले जाते. मात्र तेच पद रिक्त असल्याने व्यवहारांना खीळ बसली आहे.

Central Bank of India
Nandurbar Crime News: पूर्ववैमनस्यातून मारहाणीत एकाचा खून; संशयितांच्या मागणीसाठी नागरिकांचा पोलिस ठाण्यावर ठिय्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.