Nandurbar News : बिबट्यापासून संरक्षणासाठी वाजविला जातोय डफ; शेतकरी दिलीप होळकर यांनी लढवली नामी शक्कल

Nandurbar News : तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Cotton picking going on in Shivara with tambourine.
Cotton picking going on in Shivara with tambourine.esakal
Updated on

तळोदा : तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या खरिपाची कामे सुरू असल्याने जीव धोक्यात घालून शेतकरी, शेतमजुरांना शेतीवर जावे लागत आहे. यामुळे मजुरांची मजुरीही वाढली असून, ते मागतील तेवढी मजुरी द्यावी लागत आहे. बिबट्याच्या दहशतीखाली सध्या ठिकठिकाणी कापूस वेचणी सुरू असून, बिबट्याला दूर ठेवण्यासाठी, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तसेच शेतमजुरांवर बिबट्या किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला करू नये, म्हणून कापूस वेचणी करताना मजुरांच्या संरक्षणासाठी चक्क डफ वाजवत त्याला इशारा दिला जात आहे. (Duff is played for protection from leopard in district )

तळोदा शिवारातील आग्यावड भागातील शेतकरी दिलीप होळकर यांनी ही नामी शक्कल लढवली आहे. त्यामुळे एकीकडे कापूस वेचणी, तर दुसरीकडे डफ वाजवणे दोन्ही गोष्टी सोबतच सुरू असल्याने याची चर्चा परिसरात, चावडीवर रंगू लागली आहे. त्यात बिबट्याच्या अधिवासामुळे शेती आता आव्हानात्मक ठरत आहे. तालुक्यात दीड महिन्यात सुमारे सात जणांना बिबट्याचा हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे, तर गेल्या पंधरा दिवसांत सहा बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

मात्र अजूनही तालुक्यात कुठे ना कुठे बिबट्याच्या पाऊलखुणा शेतकऱ्यांना दिसतच आहे. त्यात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने कापूस वेचणी करत असताना बिबट्या कुठून येईल, अशी भीती शेतकऱ्यांसह शेतमजुरांना लागली आहे. त्यामुळे वेगवेगळी शक्कल लढवत शेतकरी आपल्या शेतातील कापूस वेचणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. होळकर यांनी वेगळीच शक्कल लढवत शेतमजुरांसोबतच डफ वाजवणाराही तैनात केला आहे. (latest marathi news)

Cotton picking going on in Shivara with tambourine.
Nandurbar News : सातपुड्यातील आदिवासींच्या मरणयातना संपता संपेना! प्रसूतीसाठी महिलेचा पुरातून जीवघेणा प्रवास

जसजसे मजूर कापूस वेचणी करत पुढे सरकतात तसतसे डफ वाजवणारा त्यांच्या पुढे पुढे चालत असतो. त्यातून डफ वाजवत सर्वांना व बिबट्याला सावधान करीत असतो. कळंबू परिसरातही काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कळंबू शिवारातील म्हैस नदी शिवार व देऊर, टेंभा जंगल शिवारात काही दिवसांपासून शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे.

त्यामुळे मजूर शेताकडे जाण्यास धस्तावला आहे. बिबट्या शेळ्या, कुत्रे फस्त करत असून, बऱ्याच शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे. पीक काढणीमुळे सध्या शेतकरी, मजूर शेतात असतात. मात्र बिबट्या अथवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी जाऊ शकतो, त्यासाठी वन विभागाने सीसीटीव्ही कॅमरे लावावेत, अशी मागणी होत आहे.

सोशल मीडियावर चर्चा

‘बिबट्या इथे माणसं आहेत, तू येऊ नको, कापूस वेचणी चालू आहे’, जणू काही असा संदेशच तो डफ वाजवणारा त्या बिबट्याला देत असावा, असे चित्र सध्या दिसत आहे. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा असून सोशल मीडियावरही डफ वाजवतानाचा व कापूस वेचणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कापूस वेचणीच्या हंगामात कापूस वेचणी करून घेणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे.

Cotton picking going on in Shivara with tambourine.
Nandurbar Dagadfek: दगडफेकीमागचं नेमकं कारण काय? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती | Marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.