Nandurbar News : गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात असलेली मातीची तसेच कौलारू घरे वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणावरदेखील याचा परिणाम जाणवू लागला आहे. पूर्वी ग्रामीण भागातील एखाद्या गावात गेल्यास त्या ठिकाणी आपल्याला सर्वत्र मातीची तसेच कौलारू घरे दिसत होती. कुठेही सिमेंटचे जंगल अस्तित्वात नव्हते. घरेदेखील आकर्षक होती. प्रत्येक ऋतूमध्ये ही घरे घराघरातील व्यक्तींसाठी पोषक वातावरणाची निर्मिती करत. (Effect of cement building on mud houses on way to obsolescence )
त्यामुळे ती खूपच सुरेख होती तसेच आरोग्याच्या दृष्टीने चांगलीदेखील होती. परंतु ग्रामीण भागातील लोकांचा वावर कामानिमित्त शहराकडे अधिक होऊ लागल्यामुळे आणि त्या ठिकाणी बांधण्यात आलेली सिमेंटची घरे पाहून त्यांच्या मानसिकतेतही बदल होऊ लागला. हळूहळू गावात असणाऱ्या मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घ्यायला सुरवात केली. लांबून दिसायला सिमेंटचे घर उत्तम त्याचबरोबर मजबूत वाटत असले तरी या घरात राहताना प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्रास हा घरातील सदस्यांना होतच असतो.
जुन्या काळामध्ये मातीची घरे सर्व वातावरणामध्ये पोषक मानली जायची. उन्हाळ्यामध्ये ही घरे सर्वाधिक थंड असायची. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एसी न लावता या घरात थंड वारा वाहत राहायचा. त्यामुळे भरदुपारी उन्हातदेखील घरच्या सदस्यांना शांत झोप लागायची. हिवाळ्यात ही घरे उबदार असायची. घरात जास्त थंडी जाणवत नसायची. त्यामुळे उन्हाळ्याबरोबर हिवाळ्यातदेखील या घराचे वातावरण प्रसन्न असायचे. (latest marathi news)
पावसाळ्यात याच घरांना असलेले छत उकरले जायचे. त्याच्यावर उसाचा कोरडा झालेला पालापाचोळा त्याचबरोबर तुरीच्या काड्या अंथरल्या जायच्या आणि त्यावर चिखल माखला जायचा. त्या चिखलावर नजीक असलेली खारट माती वरती टाकली जायची ज्यामुळे किती जरी पाऊस झाला तरी हे छत गळत नव्हते. कारण ती खारट माती त्या ठिकाणी घट्ट रुतून बसायची. पाऊस किती जरी झाला तरी भिंती गळून पडत नव्हत्या किंवा घरामध्ये पाणी येत नव्हते.
कौलांचा उद्योगही मंदावला
जुन्या काळात कौलारू घरांमुळे गावोगावी कुंभारांनादेखील रोजगार उपलब्ध होत होता. पावसाळ्यापूर्वी कुंभार अशा घरांसाठी कौलांची निर्मिती करत होते. हळूहळू या कौलांमध्येदेखील बदल होत गेला. साध्या कौलांची जागा इंग्लिश कौलांनी घेतली. त्यातही कौले तयार करण्यासाठी मोठमोठे व्यावसायिक पुढे येऊ लागले आणि त्यातही कौलांचा कुंभारांकडे असलेला व्यवसाय हा हिरावला गेला. मात्र आता कौलांचा उद्योगही मंदावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.