Nandurbar News : शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 15 पासून उमेदवारी अर्ज विक्री

Nandurbar : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
Teacher Constituency Election
Teacher Constituency Electionesakal
Updated on

Nandurbar News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ मे १८ जूनदरम्यान निवडणूक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता निवडणूक आयोगाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (Election program for teachers constituency on 15 june )

त्यासाठी १५ मेस अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २२ मेपर्यंत उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे, तर २४ मेस अर्जांची छाननी होणार आहे. २७ मेस उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यानंतर उमेदवार निश्चित होणार आहेत. १० जूनला प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे, तर १८ जूनला निवडणूक कार्यक्रम समाप्त होणार आहे.

जिल्ह्यात ५,४१९ मतदार

शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात एकूण ५,४१९ मतदार संख्या आहे. त्यात सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात मतदारांची संख्या जास्त आहे. तालुकानिहाय मतदारसंख्या अशी

Teacher Constituency Election
Nandurbar News : पळसाच्या पानांच्या पत्रावळी हद्दपार; प्लॅस्टिक पत्रावळींनी घेतली जागा

तालुका पुरुष महिला एकूण

अक्कलकुवा- २६९- ७१ -३४०

अक्राणी- १८३- ३२ - २१५

तळोदा -३९६- ११४ - ५१०

शहादा -१,२३७ - ४३६ - १,६७३

नंदुरबार - १,४३२- ४९९ - १,९३१

नवापूर - ५४३ - २o७ - ७५०

एकूण - ४,०६० - १,३५९ - ५,४१९

Teacher Constituency Election
Nandurbar News : तळोदा यात्रोत्सवातून कांदा, लसूण हद्दपार; बैलगाड्यांचे वैभवही झाले इतिहासजमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.