Nandurbar News : शहादा तालुक्यात विजेचा तारा चोरीला; महावितरणसह पोलिसांकडून चोरी रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे

Nandurbar : तालुक्यात गेल्या चार-पाच महिन्यांत सातत्याने विजेच्या खांबावरून अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत.
Electricity wire
Electricity wireesakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यात गेल्या चार-पाच महिन्यांत सातत्याने विजेच्या खांबावरून अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत लाखो रुपये किमतीच्या वीज तारा चोरीस गेल्या आहेत. रात्री होणाऱ्या लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा बंद असताना या चोऱ्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र महावितरण व पोलिसांकडून ही चोरी रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. ( Electricity wire theft in Shahada taluka )

बुधवारी मध्यरात्री तालुक्यातील म्हसावद शिवारात अशोक कोळी व गणेश कोळी यांच्या शेतातून १२ हजार रुपये किमतीच्या वीज तारा चोरीस गेल्याच्या गुन्ह्याची नोंद म्हसावद पोलिसांत झाली. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात बऱ्याचवेळा वीजपुरवठा बंद असतो. अर्थात लोड शेडींग, वीज कपात अधिक होत असल्याने त्यामुळे पसरलेल्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे संधी साधून खांबावरील तारा तोडून लंपास करतात. या तारा वजनदार असल्याने एका व्यक्तीचे हे काम असूच शकत नाही.

त्यासाठी स्वतंत्र टोळीच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच ही आंतरराज्यीय टोळी असावी, असाही अंदाज आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे आवश्यक आहे. अज्ञात चोरट्यांना कोणत्या भागात किती वाजता व किती वाजेपर्यंत लोडशेडिंग होणार आहे, ही माहिती तंतोतंत कोणीतरी तांत्रिक माहिती असलेली व्यक्ती पुरवत असावी, अशीही शक्यता वर्तविण्यात येत असून तपासाची गरज आहे.

Electricity wire
Nandurbar News : नवापूर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा! कमीत कमी शंभर मिलिमीटर पावसाच्या नोंदीनंतरच पेरणीचे आवाहन

शेतामध्ये अंधाऱ्या रात्री अज्ञात चोरटे वीज खांबावर चढतात, याचा अर्थ त्या भागातील वीजपुरवठाही बंद करतो. काहीवेळा पाच ते सहा वीज खांबांवरील लांबलचक तारा चोरीस गेल्या आहेत. कलमाडी, वैजाली, जावदातर्फे बोरद आदी परिसरात अनेकवेळा वीज तारा चोरीच्या घटना घडल्या आहेत. रात्रीतून चोरटे गायब होतात. विजेच्या तारा चोरणारी स्वतंत्र चोरट्यांची टोळी परराज्यात या तारा विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.

या तारा वितळवून व्यवसाय होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेमार्फत या अज्ञात चोरांचा व त्यांच्याशी संबंधितांचा शोध घेणे आवश्यक आहे. सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली असून त्याचवेळी चोरांना जणू ऊत आला आहे. पोलिसही गुन्ह्याची नोंद करण्यापलीकडे काही हालचाल करत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जलद तपास करून चोरांना जेरबंदची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त

शेतातून वा शिवारातून विजेच्या तारा चोरीला गेल्यानंतर त्या भागातील विजेचा पुरवठा बंद होतो. तो सुरळीत होण्यास बराच वेळ लागतो. पर्यायाने तेवढ्या वेळेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पिकांना वेळेवर पाणी द्यावे लागते. ते यामुळे मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आता शेतकरी, महावितरण कंपनी व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून चोरट्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

Electricity wire
Nandurbar News : बांधकाम विभागाकडे राज्यातील ठेकेदारांचे 20 हजार कोटी अडकले! संघटनेचा आंदोलनाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.