Nandurbar Fake Seed Business: बोगस विक्रेत्यांविरुद्ध ठोस पावले उचलावीत; तणनाशकाची फवारणी केल्यास शेतीचा पोत खराब

Crime News : यासाठी शासनाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध शिक्षेची ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
Fake Seed
Fake Seedesakal
Updated on

Nandurbar Fake Seed Business : खरीप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर तालुक्यातील अनधिकृत बियाणे विक्री करणारे कथित विक्रेते हातपाय पसरू लागले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे देताना पक्के बिल तर नसतेच फक्त ‘हवाला’मार्गे अनधिकृत बियाण्यांची विक्री करून गैरप्रकार करणाऱ्या घटकांना आवरण्याऐवजी किरकोळ शिक्षेचीही अंमलबजावणी नीट होत नसल्याने विक्रेत्यांचे फावते.

आजपर्यंत गेल्या दोन वर्षांत तालुक्यात काही अनधिकृत बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. गुन्हाही दाखल केला; परंतु तातडीची ठोस शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे फावते व बिनदिक्कतपणे पुन्हा विक्री सुरू होते. यासाठी शासनाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध शिक्षेची ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Nandurbar Fake Seed Business Strict steps taken against bogus seller)

दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर एचटीबीटी बियाणे चोरट्या मार्गाने उपलब्ध होत आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर सरसकट तणनाशकाची फवारणी केली तरी फक्त तण मरून जाते, पिकाला काही बाधा होत नाही, निंदणीचा खर्च नाही, ही शेतकऱ्यांची धारणा झाल्याने कथित विक्रेत्यांचे फावते.

परंतु शेतात तणनाशकाची फवारणी केल्यास शेतीचा पोत खराब होऊन उत्पादनात फरक पडतो, हे शेतकऱ्यांच्या मनात रुजविणे गरजेचे आहे. शिवाय अनेक दुष्परिणाम असूनही या वाणांची लागवड होते. संबंधित वाण विक्रीला परवानगी नाही, तरीही बिनदिक्कतपणे संबंधित वाण अवैधरीत्या विकले जाते.

विविध आमिषांना बळी पडून अनधिकृत कापूस बियाणे विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे. कृषी विभागाला माहिती मिळताच संबंधित ठिकाणी छापा टाकून, मुद्देमाल जप्त करून, कथित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठविले जातात.

परंतु पुढे पोलिस तपास व न्यायालयीन कामकाज यामुळे काही वर्ष लोटले जातात. याचाच फायदा संबंधित विक्रेत्यांना होतो. यासाठी ठोस कारवाईची अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (latest marathi news)

Fake Seed
Nandurbar Fake Seed Business: अनधिकृत बियाणे विक्रीला लगाम हवा; परवानाधारक कृषी सेवा केंद्रांची भूमिका महत्त्वाची

शहादा तालुका केंद्रबिंदू तर नाही ना?

शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होते. तसेच कृषी विभागाने गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत कापूस विक्रीचे शहादा तालुका केंद्र तर नाही ना, अशी चर्चा जनमानसांत आहे. या विक्रेत्यांच्या टोळ्याही सक्रिय झाल्याची साशंकता व्यक्त होत आहे. कृषी विभागाने तपास करून पर्दाफाश करणे गरजेचे आहे. एचटीबीटी वाणाची अवैधरीत्या विक्री होते, याची माहिती शेतकऱ्यांनीही कृषी विभागाला देणे गरजेचे आहे.

पथकांविषयीच साशंकता

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. कृषी निविष्ठांतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाचे स्वतंत्र पथके निर्माण झाली आहेत. या पथकाने तालुक्यात अद्याप एकही कारवाई केली नसल्याने या पथकांविषयीच जनमानसांत साशंकता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

"अनधिकृत बोगस बियाण्यांचा माल गुजरात भागातून सर्रास येतो. या बियाण्यांना लगाम लावण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन झाली आहे. समितीकडे स्वतंत्र वाहनासह सर्व यंत्रणा असूनही समिती तक्रारीची वाट पाहते. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाशी, जीवनमानाशी, फसवणुकीशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. तक्रार आली तर मुळापर्यंत शिरायचे नाही. कारण आजपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये खोलवर तपास नाही. नाममात्र कारवाई केली जाते."

- अनिल भामरे, शेतकरी, मंदाणा

Fake Seed
Nandurbar Fake Seed Case : दर वर्षी अनधिकृत बियाण्याचा सुळसुळाट वाढतो कसा? प्रशासनानेच पावले उचलण्याची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.