तळोदा : तालुक्यातील रांझणी, चिनोदा, रोझवा पुनर्वसन, प्रतापपूर परिसरात सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यांच्याकडून कीटकनाशकाच्या फवारणीला वेग देण्यात येत आहे. तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड दरवर्षी करण्यात येत असते. यावर्षीही कापसाचे क्षेत्रात वाढ झाली आहे. (Farmers are worried about cotton crop blight infestation )