Nandurbar Fake Seed : कांद्याच्या बोगस बियाणामुळे डोळ्यात पाणी; बलवंडला शेतकऱ्यांची फसवणूक

Fake Seed : बोगस कांद्याचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडीस आला आहे.
Fake Seed
Fake Seed esakal
Updated on

बलवंड : नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथे छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका अनोळखी व्यक्तीने बोगस कांद्याचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडीस आला आहे. या संबंधी संशयिताविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बलवंड तसेच घोटाणे येथे एक अनोळखी व्यक्ती कांद्याचे बियाणे विक्री करण्यासाठी आला होता. (Farmers were deceived by bogus onion seed )

९०० रुपये प्रतिकिलो दराने कांद्याचे बियाणे विक्री केले. बलवंड येथील अधिकार परशराम पाटील, योगेश बुधा धनगर, संजय सोमा पाटील, मोहन राजाराम धनगर, प्रकाश काळू पाटील, चतुर नारायण पाटील यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी पाच किलोपासून तर ५० किलोपर्यंत कांद्याचे बियाणे खरेदी केले. सुमारे तीन ते साडेतीन क्विंटल म्हणजे तीन लाख रुपये संशयिताने शेतकऱ्यांकडून लाटले. मात्र, कांदा बियाणे टाकल्यानंतर ते उगवलेच नाही.

Fake Seed
Nandurbar Fake Seed Business : अनधिकृत बियाण्याची झळ सर्वांनाच; आळा घालण्यासाठी ‘कृषी’बरोबरच कंपन्या

त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. सदर व्यक्ती छत्रपती संभाजीनगर परिसरातील असल्याचे सांगत होता. त्याने दिलेला संपर्क क्रमांकसुद्धा लागत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. संशयिताविरोधात अद्याप पोलिसात तक्रार दिली नसली तरी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

उधारीचा फंडा

उधारीत फक्त दोनशे रुपये देऊन एक किलो बियाणे काही शेतकऱ्यांनी विकत घेतले. कांदा काढणीनंतर दोनशे रुपये अधिक भाव म्हणजेच अकराशे रुपये प्रतिकिलो देण्याच्या बोलीतून काही शेतकऱ्यांनी बियाणे विक्री केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास बसल्याने काहींनी रोखीने दोनशे रुपये डिस्काउंट घेऊन ९०० रुपये प्रतिकिलो दराने बियाणे विकत घेतले. संशयितांना वापरलेला उधारीचा फंडा शेतकऱ्यांच्या अंगलट आला.

Fake Seed
Nandurbar Fake Seed Business: बोगस विक्रेत्यांविरुद्ध ठोस पावले उचलावीत; तणनाशकाची फवारणी केल्यास शेतीचा पोत खराब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.