Nandurbar News : मूल्यमापनात घोळ करून मर्जीतल्या शाळांना वाढीव गुण

Nandurbar : स्वतःच्या मर्जीतील शाळांना कार्यालयात बसून वाढीव गुणदान करीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाचा मूळ उद्देश संपुष्टात आणण्याचा प्रताप नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागाने केला आहे.
School
Schoolesakal
Updated on

Nandurbar News : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यातील केंद्रस्तरीय मूल्यमापन समितीच्या गुणांकनात नंदुरबार गटशिक्षणाधिकारी व त्यांचे सहकारी विस्ताराधिकारी यांनी संगनमताने केंद्रस्तरीय मूल्यमापन समितीकडून गुणदान प्रपत्रे घेऊन ऑनलाइन गुणदानाबाबत हस्तक्षेप करून केंद्रस्तरीय समितीच्या गुणदानात कपात करून स्वतःच्या मर्जीतील शाळांना कार्यालयात बसून वाढीव गुणदान करीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाचा मूळ उद्देश संपुष्टात आणण्याचा प्रताप नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागाने केला आहे. (Favored schools get extra marks by tampering with evaluation)

त्यामुळे स्पर्धा घेतलीच कशाला, त्यापेक्षा शिक्षण विभागाने कार्यालयात बसूनच स्पर्धेतील विजेत्या शाळा जाहीर केल्या असत्या, अशा उद्‍विग्न प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहेत. नंदुरबार तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात प्रामाणिकपणे सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या शाळांना गुणांची कपात करून केंद्रस्तरावरच शाळांची अडवणूक करून स्पर्धेत सहभागापासून परावृत्त केले आहे.

आम्ही आपणास गुण देत आहोत, आपण अपूर्ण मुद्द्यांची पूर्तता करून ठेवा, अशा आशयाच्या तोंडी सूचनादेखील गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांनी वाढीव गुण दिलेल्या शाळांना दिल्या असून, संबंधित शाळा अभियान संपल्यानंतर वृक्षारोपण, इमारतीतील सजावट करून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्तता करून घेत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता नंदुरबार तालुक्यातील काही शाळांनी प्रामाणिकपणे अभियानाची अंमलबाजवणी करून अतिशय मेहनत घेतली आहे. या शाळांनी अभियानाचे फेरगुणांकन व्हावे, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात, जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार व जिल्हा परिषद अध्यक्षा, डॉ. सुप्रिया गावित यांना निवेदनाद्वारे काही शाळांनी केली आहे.

School
Nandurbar Agricultural Exhibition : शहादा येथे उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व यापूर्वी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात १५ जून ते १५ फेब्रुवारी हा अभियानाचा कालावधी गृहीत धरण्यात आला आहे.

एकूण १ ते ३० मुद्दे जसे विद्यार्थिकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व विद्यार्थी सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास शाळेची इमारत, स्वच्छता, विद्यार्थी सहभाग, वर्गसजावट, वृक्षारोपण, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माणयोजनेंतर्गत परसबाग, शिल्लक अन्नावर प्रक्रिया अशा मुद्द्यांवर काम करणे अपेक्षित होते.

नंदुरबार तालुक्यातील मोजक्याच शाळांनी उपक्रमाला प्रतिसाद देत प्रभावी अंमलबजावणी केली होती; परंतु गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीतील शाळांना गुणदान करून समिती येण्यापूर्वी पूर्ण १६ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या मूल्यांकनास ज्या शाळांनी हरकत नोंदविली आहे त्या शाळांचे पुनर्मूल्यांकन करण्याबाबत कार्यवाही व्हावी व चौकशी न झाल्यास तालुका पथकाकडे तपासणीसाठी नावे कळवून तपासणी वस्तुनिष्ठ व्हावी,

School
Nandurbar News : आदिवासी समूहाला हक्क, अधिकारापासून बेदखल करण्याचे शासक जातीचे षडयंत्र : वामन मेश्राम

तसेच केंद्रस्तरीय समितीने दिलेले गुणदान कायम ठेवून शाळांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या शाळा अभियानापासून परावृत्त झाल्यास विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्या सहभागातून झालेला विकास व शाळेची प्रगती यांच्यात गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी हे अडसर ठरल्याची दाट शक्यता आहे, शाळांना न्याय मिळावा, अशी मागणी या शाळांनी केलेली आहे.

काय आहे प्रकार?

-शहरासह तालुक्यातील अनेक नावाजलेल्या शाळांचा पूर्णतः सहभाग.

-नियमामुसार उपक्रम, कार्यक्रमांची अंमलबजावणी करूनही गुणदानात फेरफार.

-मूल्यांकनाच्या वेळी गुणदान पत्रक भरले पेन्सिलीने.

-ऑनलाईन गुणदानात केला गेला घोळ.

-मूल्यांकन करतेवेळी दिलेले गुण मुख्याध्यापकांना सांगितले गेले, त्यावर सह्याही घेतल्या.

-अभियान संपल्यानंतरही अपूर्ण कामे पूर्ण करणाऱ्या शाळांना अधिक गुण देण्याच्या प्रकाराची चर्चा.

School
Nandurbar News : जिल्ह्यातून विधानसभेत 2 आमदार पाठविण्यासाठी प्रयत्न : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()