तळोदा : संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध असलेला सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, सातपुडा पायथा परिसरात ढोल बनविणे युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर ढोल वाजविण्याचा सराव रात्रीच्या वेळेत सुरू असल्याने सातपुड्यात घुंगरू आणि ढोलचे सूर घुमू लागले आहेत. परिसरात रात्री उशिरापर्यंत सराव सुरू राहत असल्याने वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. येत्या २० किंवा २१ तारखेपासून सातपुड्यात हा उत्सव सुरू होणार असल्याची माहिती आहे. (Nandurbar Festival dhol dance for Holi in Satpura marathi news)
देवमोगरा यात्रोत्सव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आदिवासी बांधव होलिकोत्सवाच्या तयारीला लागत असतात. या वर्षीही मोठ्या प्रमाणात गावागावांत होलिकोत्सवाच्या नियोजनाबाबत बैठका घेण्यात येत असून, ढोल बनविण्यासह इतर तयारी करण्यात येत आहे. ढोलचे प्रात्यक्षिक घेण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत ढोल वाजविण्यात येत आहेत. गुजरात, सौराष्ट्र येथे स्थलांतरित झालेले मजूर होळीसाठी आपापल्या गावी परतले असून, त्यांच्यात चैतन्याचे वातावरण आहे.
ग्रामस्थांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यंदा नवस असलेल्या बाबा, बुध्यांकडूनही आपापल्या बैठकी घेण्यात येत असून, त्यांच्याकडूनही होळीचे नियोजन करण्यात येऊन पाळणी करण्यात येते. विविध साहित्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. (latest marathi news)
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रेवानगर, जीवननगर पुनर्वसनसह विविध ठिकाणी पारंपरिक होलिकोत्सव साजरा होत असतो. अनेक ठिकाणी बाबा, बुध्या स्पर्धा, गेर नृत्य, ढोल स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यासह गुजरातमधूनही नागरिक याठिकाणी येत असल्याने या ठिकाणी आतापासूनच होलिकोत्सवासाठी मैदानाची स्वच्छता, रस्ते, दिवाबत्तीची व्यवस्था अशा विविध कामांना गती देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.