Nandurbar Flood News: नर्मदा काठावरील गावांना पुराचा वेढा! मणिबेली बनले टापू

Manibeli village made into an island
Manibeli village made into an islandesakal
Updated on

Nandurbar Flood News : नर्मदा नदीला आलेल्या पुरामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रात पाणी भरले आहे. त्यामुळे नर्मदा काठावरील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. मणिबेली गाव टापूसदृश बनले असून, तेथील नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे.

त्यामुळे नदीच्या पाण्याचा वाढता प्रवाह पाहून तेथील गावकरी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे पाण्यात साप, मगर यांचा वावर वाढला असल्याने नागरिकांना अधिक सतर्कता बाळगावी लागत आहे. (Nandurbar Flood News Villages on banks of Narmada surrounded by floods Manibeli became an island)

सातपुड्यात सुरू असलेली संततधार व नर्मदा नदीच्या उगम क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यात महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात पाणी अडविले जात असल्याने जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातही पाणी भरले.

मणिबेलीत घरांच्या परिसरात पाणी येत असून, परत एकदा पाणी जवळ आल्याने साप, विंचू, मगर यांचे भय वाढले आहे. दुसरीकडे पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.

चिमलखेडी येथील अर्जुन पोयरा वसावे यांच्या घरापर्यंत नर्मदेचे पाणी आले. अशीच काहीशी परिस्थिती बामणी, डनेल येथील आहे. तेथे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, सरदार सरोवराच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अनेकांचे पुनर्वसन अपूर्ण असल्याची व्यथा विस्थापित मांडतात; पण अजूनही त्यात यश आलेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Manibeli village made into an island
Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या फुफाट्यात

पाणी वाढत असल्याने तेथील गावकरी रात्र जागून काढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नर्मदा नदीवरील पाण्याची पातळी नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे.

संपूर्ण पुनर्वसन कधी होणार?

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्यांचे पुनर्वसन हा अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा बनला आहे. पाण्याची पातळी वाढली, की तेथील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. तेथे असलेल्या जीवनशाळांच्या विद्यार्थ्यांनाही पाणी प्रवाह वाढल्याचा त्रास होतो.

त्यामुळे तेथील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन केव्हा होणार, असा प्रश्न आहे. सध्या तरी पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जाते.

Manibeli village made into an island
Nandurbar Flood News: तापीला महापूर, पुलाला भगदाड! टाकरखेडाकडील भरावही वाहून गेला; वाहतूकही थांबविली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.