नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात महायुती व महाविकास आघाडीतच लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही महायुती व महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित होत नसल्याने कोणता मतदारसंघ कोणत्या मित्र पक्षाला जाईल, हे अनिश्चित आहे. स्थानिकस्तरावर नेत्यांनी मागणी केलेल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप व कॉंग्रेस दोन्हीही चारही मतदारसंघावर दावे करू लागले आहेत. त्यामुळे मित्र पक्षांचे इच्छुक बुचकळ्यात पडले आहेत. (Grand Alliance seat allocation formula not decided of Vidhan Sabha Election )
नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. तर कॉंग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मागील निवडणुकीत युतीमध्ये अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. तर नंदुरबार, शहादा-तळोदा व नवापूर हे तीन मतदारसंघ भाजपकडे होते. तर कॉंग्रेसने चारही मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्याच फार्म्यूल्यानुसार सध्या महायुतीचे जागा वाटप होईल, असे शिंदे शिवसेनेला वाटते.
त्यामुळे अक्कलकुवा -अक्राणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचाच असेल. म्हणून या मतदारसंघात गेली पाच वर्षे विशेष लक्ष देऊन शिवसेनेने चांगली कामे केली. त्यासाठी शिवसेनेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विशेष लक्ष देत मुख्यमंत्र्यांकडून या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत होते. तर भाजप इतर तीन मतदारसंघात लक्ष देत आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) महायुतीत आहे.
त्यामुळे नवापूरच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला आहे. त्यानुसार तेथे इच्छुक उमेदवार निश्चितही केले आहेत. निवडणुकीची तयारी सुरू आहे. स्थानिक नेत्यांनी आपआपल्या पद्धतीने महायुतीचे मतदारसंघ निश्चित केले असले तरी वरिष्ठ पातळीवरून त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यातच भाजपचे नेते किमान तीन मतदारसंघांवर दावा करीत आहेत. त्यात नंदुरबार व शहादा-तळोदा तर आहेतच. (latest marathi news)
तेथे त्यांचे विद्यमान आमदार आहेत. नवापूर मतदारसंघावरही दावा कायम आहे. भाजप या तीन मतदारसंघांवर दावा करीत आहे. शिवसेनेने एका मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. असे असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोणता मतदार संघ मिळेल, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे मतदारसंघनिहाय जागा वाटपाचा फॉर्म्यूला वरिष्ठ पातळीवर पक्षीय नेते ठरवत नाहीत, तोपर्यंत अक्कलकुवा-अक्राणी व नवापूर मतदारसंघाचा महायुतीपुढील तिढा कायम आहे.
''मागील वर्षी तीन मतदारसंघ भाजपकडे होते. ते यंदाही कायम राहतील. मित्र पक्षांना त्यांनी त्यांचे मागील मतदारसंघात उमेदवार द्यावेत. भाजप मात्र तिनही जागांवर उमेदवार देईल.''- विजय चौधरी, प्रदेश महामंत्री, भाजप
''नवापूर मतदारसंघाची आम्ही मागणी केली आहे. तेथे आम्हाला पोषक वातावरण आहे. उमेदवारही चांगला आहे. राष्ट्रवादीला यश मिळेल. या मतदारसंघाची मागणी केलेली आहे आणि तो आम्हाला मिळेल.''- डॉ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.