Nandurbar News : रक्षाताईंच्या माहेरी खेडदिगरला आनंदोत्सव! भाऊंसह माहेरचेही शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत

Nandurbar News : दिल्ली येथे आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच रक्षाताईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Raksha Khadse
Raksha Khadse esakal
Updated on

शहादा : जिल्ह्यातील एका कन्येचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने मंत्रिपदाची संधी हुकली असली, तरी जिल्ह्यातीलच खेडदिगर (ता. शहादा) येथील माहेर असलेल्या रावेरच्या खासदार रक्षा खडसे या दुसऱ्या कन्येला केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. ‘आपली रक्षाताई मंत्री झाली’ म्हणून समाजबांधवांसह साऱ्याच जिल्हावासीयांना आनंद झाला. (Nandurbar Happy people for Raksha khadse of Khed Digar)

दिल्ली येथे आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच आज रक्षाताईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे माहेर खेडदिगर येथील. त्यामुळे तेथेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नंदुरबारमधून भारतीय जनता पक्षातर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणाऱ्या डॉ. हीना गावित यांचा पराभव झाला.

त्या निवडून आल्या असत्या तर पंतप्रधानांच्या गुडबुकमध्ये असल्याने त्यांना मंत्रिपदाची संधी नक्कीच मिळाली असती. आता जिल्ह्याला मंत्रिपद नसले, तरी जिल्ह्यातील माहेर असलेल्या कन्येला मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. (latest marathi news)

Raksha Khadse
Lok Sabha Election 2024 : राज्यात 91 टक्के उमेदवारांची ‘अनामत’ जप्त; ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीसह सपचा समावेश

माहेरची मंडळीही दिल्लीत दाखल

आपल्या मुलीची मंत्रिपदी निवड होत असल्याचा दूरध्वनी आल्यावर या आनंद सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी माहेरची मंडळी तत्काळ दिल्लीकडे रवाना झाली. आजपर्यंतचा रक्षा खडसेंच्या राजकीय कारकीर्दीत माहेरवासीयांचाही सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारापासून ते निकाल लागेपर्यंत नातेवाईक, सगेसोयरे रावेर मतदारसंघात श्रीमती रक्षा खडसे यांच्या विजयासाठी ठाण मांडून होते. त्यामुळे त्यांच्या विजयाचा आनंदोत्सवही साजरा करण्यात आला.

"रक्षाताईला मंत्रिपद मिळाले, याचा मनस्वी आनंद आहे. आम्ही या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब दिल्लीत दाखल झालो आहोत. सासरसोबत आता जिल्ह्याच्याही अर्थात माहेरच्या विकासाला ताईच्या माध्यमातून हातभार निश्चितच लागेल."

- डॉ. प्रियांक पाटील, रक्षा यांचे भाऊ, खेडदिगर

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Result : पालकमंत्र्यांची रणनीती, भाजपची बूथ योजना अन राष्ट्रवादीची साथ यातूनच स्मिता वाघांना लीड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.