Nandurbar News : शहरातील इलाई चौक व मराठा चौक परिसरातील गटारींचे बांधकाम अत्यंत चुकीचा पद्धतीने झाल्याने या परिसरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तळोदा शहरातील सखल भागात इलाही चौक व मराठा चौक यांचा समावेश होतो. (health of residents is in danger due to stench of sewage on Taloda road )
इलाही चौक भागात पूर्वीपासून गटार असून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गटार ही अतिशय छोटी असून त्यात पाण्याचा निचरा होत नाही. तसेच या भागात आजूबाजूला गटारावर अतिक्रमण झाल्याने घाण, पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने अनेकदा गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्याचप्रमाणे मराठा चौकातील गटाराची तीच अवस्था आहे. अनेक घरांसमोरील गटार पूर्णपणे गाळ भरल्याने पाण्याचा निचरा होत नसून पाणी तुंबून रस्त्यावर येते.
हे दूषित पाणी कालिका माता मंदिरापर्यंत वाहत जाते. गटारचे बांधकाम चुकीचा पद्धतीने झाल्याने सफाई कर्मचारी येऊनही प्रश्न सुटत नाही. पावसाळा येऊन ठेपला असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी गटार तत्काळ नवीन बांधून द्यावी किंवा पाइप टाकून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)
अतिशय उथळ व अरुंद गटारामुळे वर्षभरापासून दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे. याबाबत पालिकेत अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्याने आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. दरम्यान गटारींचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याने ही समस्या निर्माण झाली असून संबंधित पालिका प्रशासनाकडून अशा कामात होणारे दुर्लक्ष यामुळे निधीचा चुराडा झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
उच्चभ्रू नागरिक नसल्याने दुर्लक्ष
ज्या भागात नियमितपणे ही समस्या असते. त्या भागात गरीब व मध्यमवर्गीय लोक राहतात. शहरात स्वच्छता ही समस्या सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आहेत. मात्र याबाबत पालिकेत तक्रार केल्यास तक्रार कोणी केली, याचा विचार करून त्यावर कार्यवाही होते. कारण या भागात असणाऱ्या या समस्येबाबत अनेकदा तक्रार करूनही पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. मात्र राजकीय नेता वा उच्चभ्रू व्यक्तीकडून तक्रार आल्यास तत्काळ दखल घेतली जाते, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.